police search thief house found 400 pairs of womens undergarments in alabama america
चोराच्या घराची पोलिसांनी घेतली झडती, महिलांच्या मिळाल्या अंडरगारमेंट्स आणि... By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 03:46 PM2021-07-27T15:46:35+5:302021-07-27T15:53:28+5:30Join usJoin usNext Crime News : हे प्रकरण अमेरिकेच्या अलाबामा (US, Alabama) राज्यातील आहे. एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न आणि हल्ल्या केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली. यावेळी पोलिसांना आरोपी व्यक्तीच्या घरात महिलांच्या अंडरगारमेंट्सच्या 400 हून अधिक जोड्या सापडल्या आहेत. इतकेच नाही तर त्याच्या घरातून अनेक महिलांचे वैयक्तिक फोटोही जप्त करण्यात आले. हे सर्व पाहिल्यानंतर पोलिसांना मोठा धक्काच बसला. त्यानंतर पोलिसांनी त्याची सखोल चौकशी करण्यात सुरूवात केली. हे प्रकरण अमेरिकेच्या अलाबामा (US, Alabama) राज्यातील आहे. याठिकाणी पोलिसांनी अलाबामा येथील एका महिलेवर हल्ला करून चोरी केल्याचा संशय असलेल्या एका व्यक्तीच्या घराची झडती घेतली. यावेळी त्याच्या घरात महिलांच्या अंडरगारमेंट्सच्या 400 हून अधिक जोड्या आढळल्या. आरोपी जॉन थॉमस यांच्या घरातून पोलिसांना बर्याच महिलांचे वैयक्तिक फोटोही सापडले. हे फोटो त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांचे होते. महिलांच्या परवानगीशिवाय त्यांने अनेक फोटो घेतले होते. 27 वर्षीय जॉन थॉमसवर बलात्काराचा प्रयत्न, चोरीचे तीन गुन्हे आणि क्रेडिट कार्ड घोटाळ्याचा आरोप आहे. त्याचा गुन्हेगारीचा इतिहास आहे. महिलांच्या अंडरगारमेंट्सच्या 400 जोड्या चोरीच्या आहेत की, विकत घेतल्या आहेत, याचा शोध घेण्याचा सध्या पोलीस प्रयत्न करीत आहेत. तसेच महिलांच्या अंडरगारमेंट्स ठेवण्यामागील हेतू काय आहे, हे सुद्धा तपासले जात आहे. पोलिसांनी सांगितले की, जॉन थॉमस यांच्यावर 2019 साली महिलांच्या अंडरगारमेंट्स चोरी केल्याचा आरोप होता. त्याला 10 जुलैला अटक करण्यात आली. ज्यावेळी एका महिलेने पोलिसांना एक व्यक्ती अपार्टमेंटमध्ये घुसल्याची माहिती दिली होती. जॉन आणि या महिलेची झटापट झाली. यात महिला जखमी झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, अधिकारी येण्यापूर्वी जॉन पळून गेला. यावेळी जॉनने महिलेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा चौकशीतून समोर आले. महिलेचा गेम कन्सोल चोरण्यासाठी अपार्टमेंटमध्ये गेलो होतो, असे अटक झाल्यानंतर जॉन थॉमसने सांगितले. मात्र, महिलांच्या संमतीशिवाय त्यांचे फोटो काढल्याचा देखील त्याच्यावर आरोप आहे. त्याच्या घरातून अनेक महिलांचे फोटो सापडले आहेत.Read in Englishटॅग्स :गुन्हेगारीअमेरिकाCrime NewsAmerica