धक्कादायक! प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली पतीची हत्या, सासू-सासऱ्यांनीही दिली यात साथ By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 02:15 PM 2021-07-03T14:15:38+5:30 2021-07-03T14:25:21+5:30
पत्नी, तिचा प्रियकर, आई आणि सावत्र वडिलांनी मिळून या हत्येचा दुर्घटनेचं रूप देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांसमोर त्यांचं बिंग फुटलं आणि त्यांनी हत्येचं रहस्य उलगडलं. अनैतिक संबंधाच्या प्रकरणातून पत्नीने आपल्या प्रियकराच्या, आईच्या आणि सावत्र वडिलांच्या मदतीने पतीची हत्या करत सात जन्माचं नातं तोडलं आहे. राजस्थानच्या भीलवाडा शहरातील प्रतापनगरमध्ये ही घटना घडली.
पत्नी, तिचा प्रियकर, आई आणि सावत्र वडिलांनी मिळून या हत्येचा दुर्घटनेचं रूप देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांसमोर त्यांचं बिंग फुटलं आणि त्यांनी हत्येचं रहस्य उलगडलं.
भीलवाडा शहराचे पोलीस अधिक्षक भंवर रणधीर सिंह म्हणाले की, रघुवीर बलाई आपल्या पत्नीसोबत भीलवाडाच्या बाबा धामजवळ भाड्याने राहत होता होता. तो मजुरी करत होता. कामानिमित्त तो भीलवाडातून बाहेर बिजौलियां येथे खाणीत कामाला जात होता.
रघुवीरच्या अनुपस्थितीत त्याची पत्नी रिंकू गोपाल बलाई नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आली. दोघांची जवळीकता वाढली. याची माहिती पतीला लागली तर तो तिला यावरून बोलत होता.
२५ आणि २६ डिसेंबर दरम्यान रात्री त्याची पत्नी रिंकूने प्रियकर गोपाल, आई सम्पती आणि वडील डूंगर सिंहसोबत पतीच्या हत्येचा प्लॅन केला. त्याच रात्री पतीला तिने दारू पाजली आणि त्याला गंभीर मारहाण केली. त्यानंतर त्याला भीलवाडा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
रघुवीरची स्थिती गंभीर असल्याने त्याला उदयपूर येथे शिफ्ट करण्यात आलं. इथेच त्याचा मृत्यू झाला. पुढे प्लॅननुसार पत्नी आणि इतर आरोपींनी रघुवीरच्या भावाला सांगत पोलिसात दुर्घटनेची तक्रार देण्यास सांगितलं. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत चौकशी सुरू केली.
त्यानंतर रघुवीरचा भाऊ रमेश भावाचं घर रिकामं करण्यासाठी गेला असता शेजाऱ्यांनी त्याला सांगितलं की, रघुवीरसोबत त्याची पत्नी, त्याची सासू, सावत्र वडील आणि प्रियकराने मारहाण केली होती.
याच आधारावर रघुवीरचा भाऊ रमेशने हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर या पोलिसांनी या हत्येचं रहस्य उलगडलं. पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली रिंकूचा प्रियकर गोपाल बलाई आणि सावत्र वडिलांना अटक केली.
रघुवीरच्या हत्येनंतर पत्नी रिंकू आपला प्रियकर गोपालसोबत मुंबईला फरार झाली होती. ज्यामुळे घटनेबाबत संशय निर्माण झाला होता. पोलीस आरोपी रिंकू आणि तिच्या आईचा शोध घेत आहेत.