लिव्ह-इन पार्टनरसोबत राहूनही दुसऱ्यासोबत ठेवायचे होते संबंध आणि मग झालं असं...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 01:04 PM2023-03-11T13:04:00+5:302023-03-11T13:23:20+5:30

Crime News : महिला त्याच्यासोबत इतरांसोबतही अनैतिक संबंध ठेवत होती. हे आरोपीला आवडलं नाही. नातं संपवण्याबाबत तो तिच्याशी बोलला होता.

मध्य प्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यातील सुवासरा भागात सध्या एक खळबळ उडाली आहे. इथे एका महिलेची हॉटेलमध्ये हत्या झाली. महिलेची हत्या तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या व्यक्तीनेच केली. महिला त्याच्यासोबत इतरांसोबतही अनैतिक संबंध ठेवत होती. हे आरोपीला आवडलं नाही. नातं संपवण्याबाबत तो तिच्याशी बोलला होता. पण ती त्याचा पिच्छा सोडत नव्हती.

या सगळ्याला कंटाळून आरोपीने महिला गळा आवळून तिची हत्या केली. दोघेही गेल्या 9 महिन्यांपासून सोबत राहत होते. आरोपी महिलेची हत्या करून घटनास्थळावरून फरार झाला.

पोलिसांनी दोन तासांमध्ये त्याला अटक केली. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. महिला आधीच विवाहित होती. तिला एक मुलगाही होता.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना सूचना मिळाली होती की, मोती महल हॉटेलच्या 108 रूममध्ये महिलेचा मृतदेह आहे. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. महिला मृत पडलेली होती. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा समजलं की, तिचं नाव ममता बागरी आहे. ती राजस्थानच्या झालावाडमधील राहणारी आहे.

पोलिसांना माहिती मिळाली की, ती तूफान बागरीसोबत इथे थांबली होती. महिलेच्या मृत्यूनंतर तूफान फरार झाला होता. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावरच संशय आला. पोलिसांनी नाकाबंदी करून त्याचा शोध घेतला. तेव्हा त्याला शामगढमधून अटक करण्यात आली.

एसपी अनुराग सुजानिया यांनी सांगितलं की, आरोपीची चौकशी केल्यानंतर त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले. त्याने सांगितलं की, महिला आधीच विवाहित होती आणि तिला एक मुलगाही आहे. ती घटस्फोट न घेता गेल्या 9 महिन्यांपासून त्याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत होती.

तूफान बागरीने पोलिसांना सांगितलं की, ममता 9 महिन्यांआधी राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातून माझ्यासोबत पळून आली होती. आम्ही दोघांनी सोबत राहण्याचा करारही केला होता. यादरम्यान मजुरी करण्यासाठी आम्ही राजस्थानच्या सीकरमध्ये गेलो. तिथे ममताने दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध ठेवत होती.

जेव्हा मला याबाबत समजलं तर मी विरोध केला. पण तिने ऐकलं नाही. मी ममताला म्हणालो की, तू बेपत्ता झाल्याची तक्रार राजस्थानच्या बडोद पोलीस स्टेशनमध्ये दाखल आले. तिथे जाऊन त्यांना भेट. मी तुला तुझे आई-वडील किंवा पतीकडे सोपवतो.

तूफानने सांगितलं की, मला तिच्यापासून पिच्छा सोडवायचा होता. मग ती पतीसोबत राहो किंवा तिच्या आई-वडिलांसोबत. पण ममता ऐकायला तयार नव्हती. ती मला सोडायला तयार नव्हती आणि दुसऱ्या प्रियकरालाही सोडणार नव्हती.

यावरूनच आमच्यात भांडण जालं आणि मग मी तिचा गळा दाबला. त्याने सांगितलं की, होळीमुळे ममताच्या जबाबात एक दिवसाचा उशीर झाला.