मुलाने आईला वडिलांचे नाव विचारले अन् २७ वर्षांनी झाला गॅंगरेपचा खुलासा.... By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 12:17 PM 2021-03-08T12:17:06+5:30 2021-03-08T12:34:01+5:30
महिलेने तक्रारीत सांगितले की, १३ वर्षांची असताना ती गर्भवती झाली होती. १९९४ मध्ये तिने मुलाला जन्म दिला होता. हा मुलगा शाहाबाद भागातील उधमपूर गावातील एका व्यक्तीला देण्यात आला. उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये १२ वर्षाची असताना रेपची शिकार झालेल्या पीडितेने घटनेच्या २७ वर्षांनंतर कोर्टाच्या आदेशावरून आरोपीं विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. घटनेनंतर मुलगी गर्भवती झाली होती आणि तिने बाळाला जन्मही दिला होता.
मोठा झाल्यावर मुलाने वडिलांचं नाव जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलीस अधीक्षक संजय कुमार यांनी शनिवारी सांगितले की, साधारण २७ वर्षाआधी मुलगी बहीण आणि भाओजीच्या घरी राहत होती. यादरम्यान त्याच भागातील नाकी हसन हा घरात घुसला आणि त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला.
पोलीस अधिकाऱ्यांनी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार सांगितले की, हसननंतर त्याचा लहान भाऊ गुड्डू यानेही मुलीवर बलात्कार केला.
पीडितेने आरोप लावला की, आरोपींनी अनेकदा तिचं लैंगिक शोषण केल. कुमार यांनी सांगितले की, पीडिता त्यावेळी १२ वर्षांची होती.
महिलेने तक्रारीत सांगितले की, १३ वर्षांची असताना ती गर्भवती झाली होती. १९९४ मध्ये तिने मुलाला जन्म दिला होता.
हा मुलगा शाहाबाद भागातील उधमपूर गावातील एका व्यक्तीला देण्यात आला. यादरम्यान पीडितेच्या भाओजींची बदली रामपूर जिल्ह्यात झाली आणि मुलगीही त्यांच्यासोबत गेली.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, तिच्या भाओजींनी तिचं लग्न गाजीपूर जिल्ह्यातील एका व्यक्तीसोबत लावून दिलं. मात्र, १० वर्षांनी जेव्हा तिच्या पतीला तिच्यासोबत झालेल्या रेपबाबत समजलं तेव्हा त्याने तिला घटस्फोट दिला.
त्यानंतर महिला तिच्या गावात येऊन राहू लागली. कुमार यांनी सांगितले की, आता महिलेचा मुलगा मोठा झाला होता. त्याने आई- वडिलांबाबत विचारले तर त्याच्या आईचे नाव सांगण्यात आले. पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, मुलगा आईला भेटला आणि त्याने पूर्ण घटना समजली.
महिलेच्या तक्रारीनुसार महिलेने दोन लोकांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. कुमार यांनी सांगितले की, पोलीस घटनेचा तपास करत आहे.
तर पीडितेच्या मुलाची डीएनए टेस्ट केली जाईल. पोलिसांनी आधी महिलेची तक्रार घेतली नव्हती. तेव्हा महिलेने कोर्टात मदत मागितली होती.