rhea chakraborty transacted 15 crore rupees from sushant singh rajput bank account father accuses
रियाने सुशांतच्या अकाऊंटमधून एका महिन्यात १५ कोटी काढले, वडिलांचा गंभीर आरोप By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 08:04 AM2020-07-29T08:04:54+5:302020-07-29T08:50:03+5:30Join usJoin usNext अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाला नवे वळण आले आहे. सुशांतच्या वडील के. के. सिंह यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाटणा येथील राजीव नगर पोलीस ठाण्यात सुशांतची प्रेयसी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरुद्ध (FIR Against rhea chakraborty) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांतच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत रियावर गंभीर आरोप केले आहे. सुशांतला बॉलिवूड सोडून केरळमध्ये जाऊन तेथे ऑर्गेनिक शेती करायला जायचे होते. मात्र, रियाने सुशांतला थांबवले आणि त्याच्याबरोबर ती शिफ्ट होऊ शकणार नाही, असे सांगितले. सुशांतच्या वडिलांनी सांगितले की, ज्यावेळी सुशांतला हे मान्य नव्हते, त्यावेळी रिया त्याचे सर्व दागिने, पैसे, क्रेडिट कार्ड, महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप आणि वैद्यकीय अहवाल घेऊन तिच्या घरी गेली. तिथे जाऊन तिने सुशांतचा नंबर ब्लॉक केला. सुशांतने आपल्या बहिणीला बोलावून सांगितले होते की, तिने सर्व कागदपत्रे घेतली आहेत आणि सुशांत वेडा असून त्याच्यासोबत कोणीही पुन्हा काम करणार नाही, असे मीडियासमोर सांगण्याची धमकी दिली होती. 2019 मध्ये रियाला भेटण्यापूर्वी सुशांत पूर्णपणे बरा होता. मग काय झाले की, रियाला भेटल्यानंतर काही महिन्यांतच त्याला मानसिक आजार झाला? सुशांत मानसिक आजारी होण्याचे कारण काय होते, याची चौकशी झाली पाहिजे. सुशांतसिंग राजपूतला मानसिक त्रास होत असेल तर त्यांच्या कुटुंबीयांना का सांगितले गेले नाही? यासंदर्भातील माहिती त्याच्या कुटुंबीयांना आधी मिळायला हवी होती. रिया सुशांतला तिच्या घरी घेऊन गेली आणि उपचारादरम्यान त्याला अनेकदा ओव्हरडोज दिले. रियाने सर्वांना सांगितले की सुशांतला डेंग्यू आहे. सुशांतला रिया कोणताही चित्रपट साइन करण्यास परवानगी देत नव्हती. ज्यावेळी प्रस्ताव येते होते. त्यावेळी त्या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री म्हणून रिया पाहिजे, अशी अट सुशांतने घातली पाहिजे, असा दबाव ती त्याच्यावर आणत होती. सुशांतचे सर्वात विश्वासू आणि जुने कर्मचार्यांची रियाने बदलले आणि आपल्या ओळखीच्या लोकांना कामावर घेतले. जेणेकरून सुशांतच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवता येऊ शकेल. सुशांतचे सर्वात विश्वासू आणि जुने कर्मचार्यांची रियाने बदलले आणि आपल्या ओळखीच्या लोकांना कामावर घेतले. जेणेकरून सुशांतच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवता येऊ शकेल. डिसेंबर 2019 मध्ये रियाने सुशांतचा नंबर जबरदस्तीने बदलला. ज्यामुळे तो आपल्या कुटुंबीयांशी आणि आपल्या जवळच्या लोकांशी बोलू शकला नाही. रियाने सुशांतला आपल्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पटना येथे जाण्यास सुद्धा बंदी घातली होती. 2019 मध्ये सुशांतच्या खात्यात 17 कोटी रुपये होते. परंतु पुढच्या काही महिन्यांत त्याच्या खात्यातून 15 कोटी रुपये काढून घेण्यात आले. ही रक्कम अशा खात्यांना पाठविली गेली होती, ज्यांचा सुशांतशी काही संबंध नव्हता. रिया आणि तिच्या कुटुंबीयांच्या खात्यात किती पैसे आले आणि कोठून आले याची चौकशी झाली पाहिजे, असे सुशांतच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.Read in Englishटॅग्स :सुशांत सिंग रजपूतपोलिसबॉलिवूडसुशांत सिंगरिया चक्रवर्तीSushant Singh RajputPolicebollywoodSushant SinghRhea Chakraborty