वेगळं वळण : रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात केली मुंबई पोलिसात तक्रार, हे आहे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 05:49 PM2020-09-07T17:49:46+5:302020-09-07T18:13:02+5:30

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या प्रकरणाला रोज नवं वळण येत असल्याचं आपण पाहत आहोत. या प्रकरणातील संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या रिया चक्रवर्ती हिने सुशांतच्या बहिणीविरूद्ध मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

रियाने सुशांत सिंग राजपूतची बहीण प्रियंका सिंह आणि राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे डॉक्टर तरुण कुमार यांच्यासह इतरांविरूद्ध तक्रार दाखल केली आहे.

रिया चक्रवर्ती यांनी सुशांतसिंग राजपूत यांचे बनावट मेडिकल प्रिस्क्रिप्शन बनविण्यावरून ही तक्रार दाखल केली आहे. एनडीपीएस कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल आणि टेल मेडिसिन प्रॅक्टिस गाईडलाईन्स 2020 अंतर्गत तक्रार दिली आहे. रिया चक्रवर्ती हिचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

८ जून रोजी रिया चक्रवर्ती यांचे वकील सतीश मानेशिंदे यांच्या म्हणण्यानुसार, सुशांत सिंग राजपूत यांची बहीण प्रियंका सिंह हिने राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे डॉ. तरुण कुमार यांच्याकडून बनावट वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन तयार करून घेतलं होतं. सतीश डॉक्टर तरुणकुमार डॉक्टरांनी लिहिलेली औषधे एनडीपीएस कायद्यांतर्गत येतात आणि त्यांच्यावर बंदी आहे.

एनडीपीएस कायद्यात हि औषधं किंवा सायकोट्रॉपिक औषधं सूचीबद्ध आहेत. टेली मेडिसीन प्रॅक्टिस गाईडलाईन्स ऍक्ट 3.7.1.4 अंतर्गत हे गैरवर्तन आहे.

सुशांतचे वडील के के सिंग यांनी पाटणा पोलीस ठाण्यात रियाविरोधात तक्रार दाखल केली होती.