हद्द झाली! नोकरीवरून काढले, बदल्यासाठी कम्पाऊंडरने महिला डॉक्टरच्या भांगेत पिंजर भरली By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 11:13 AM 2021-07-14T11:13:46+5:30 2021-07-14T11:21:02+5:30
samastipur compounder Doctor news: एका खासगी हॉस्पिटलमधून नोकरीवरून काढल्याच्या रागातून कंम्पाउंडरने डॉक्टरसोबत बदला घेण्याचा प्लॅन केला, त्याने जे केले ते पाहून डॉक्टरला धक्का बसलाच परंतू तुम्हालाही धक्का बसेल. एकतर्फी प्रेमातून किंवा बदला घेण्यासाठी कोण कोणत्या थराला जाईल सांगता येत नाही. बिहारच्या समस्तीपूरमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका खासगी हॉस्पिटलमधून नोकरीवरून काढल्याच्या रागातून कंम्पाउंडरने डॉक्टरसोबत बदला घेण्याचा प्लॅन केला, त्याने जे केले ते पाहून डॉक्टरला धक्का बसलाच परंतू तुम्हालाही धक्का बसेल. ( samastipur compounder took Revenge, filled the sindur to female doctor video viral.)
नोकरी गेल्यानंतर नाराज झालेला कम्पाऊंडर महिला डॉक्टरच्या चेंबरमध्ये घुसला. त्या डॉक्टरला काही समजण्याच्या आतच त्याने तिच्या भांगेत पिंजर भरली. महत्वाचे म्हणजे या कम्पाऊंडरने या घटनेचा व्हिडीओ आणि फोटो देखील काढला.
कम्पाऊंडरने ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले, ज्या नंतर महिला डॉक्टरने त्याच्या विरोधात दलसिंहसराय पोलीस ठाण्यात तक्रार केली. पीडित डॉक्टर तेथीलच एका प्राथमिक आरोग्य केंद्राची प्रभारी शल्यचिकित्सक आहे.
ती त्याच शहरात एक खासगी हॉस्पिटल देखील चालविते. या हॉस्पिटलमध्ये सुमित कुमार हा नोकरी करत होता. त्याच्या वागणुकीमुळे त्या महिला डॉक्टरने त्याला नोकरीवरून काढून टाकले होते.
यामुळे नाराज झालेल्या कम्पाऊंडरने बदला घेण्याचा डाव धरला. एक दिवस अचानक तो हॉस्पिटलमध्ये आला. ती महिला डॉक्टर तिच्या केबिनमध्ये होती, तिच्याकडे जात तिला काही कळायच्या आत भांगेत पिंजर भरली. यावेळी तो या प्रकाराचा व्हिडीओ शूट करत होता.
सुमित एवढ्यावरच थांबला नाही, त्याने या प्रकाराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. डॉक्टरसोबत असा प्रकार झाल्याने हे फोटो कमालीचे व्हायरल झाले.
हे फोटो डॉक्टरच्या ओळखीच्या लोकांनी पाहिले. त्यांनाही धक्का बसला. त्यांना वाटले डॉक्टरने लग्न केले असेल. म्हणून त्यांनी डॉक्टरना फोन करायला सुरुवात केली. यावेळी त्या महिला डॉक्टरला धक्का बसला आणि तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी डॉक्टरच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. हे कळताच सुमित गावातून पसार झाला आहे. चौकशीसाठी पोलीस देखील त्या हॉस्पिटलमध्ये गेले होते.
समस्तीपूरचे पोलिस अधिक्षक मानवजीत सिंह ढिल्लो यांनी सांगितले की, पीएचसीच्या प्रभारी खासगी हॉस्पिटलदेखील चालवितात. त्यांच्याकडून तक्रार मिळाली होती. या तक्रारीनुसार आरोपीला दोन महिन्यांपूर्वी कोणत्या कारणावरून नोकरीवरून काढून टाकले होते.
महिला डॉक्टरनुसार तो अचानक तिच्या केबिनमध्ये आला होता आणि तिच्या भांगेत पिंजर भरून त्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल केले होते. आरोपीच्या अटकेचे आदेश दिलेले आहेत. त्याला लवकरच अटक केली जाईल, असे त्यांनी सांगितले.