मुलीला बॉयफ्रेंडसोबत बोलताना पाहिले, संतापलेल्या सावत्र पित्याने असे काही केले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 11:58 PM2021-04-01T23:58:25+5:302021-04-02T00:02:23+5:30

Crime News : सावत्र वडिलांनी या मुलीला तिच्या प्रियकरासोबत बोलताना पाहिले होते.

बिहारची राजधानी असलेल्या पाटणामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील फतुहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अब्दुल्लापूर गावामध्ये बुधवारी पुनपून नदीच्या किनाऱ्यावर एका तरुणीचा मृतदेह सापडला होता. मृत तरुणीचे वय सुमारे १५ वर्षांपर्यंत होते. या तरुणीचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह सापडल्यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवला.

या संपूर्ण प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली. मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुणी ही नालंदा जिल्ह्यातील एकंगर सराय गावातील रहिवासी होती. होळी दिवशी तिची हत्या करून मृतदेह पुनपून नदीत फेकण्यात आला होता. या प्रकऱणी पोलिसांनी तपास केला तेव्हा काही धक्कादायक माहिती समोर आली.

या तरुणीची हत्या तिच्या सावत्र वडिलांनी गळा आवळून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. मृत तरुणीच्या आजोळच्या नातेवाईकांनी आरोप केला की, तिच्या सावत्र वडिलांनी या मुलीला तिच्या प्रियकरासोबत बोलताना पाहिले होते. त्यानंतर त्यांनी तिला मारहाण केली. तसेच तिचा गळा आवळून हत्या केली.

या घटनेनंतर मृत तरुणी संतोषीचा मृतदेह एकंगर सराय येथून गाडीमध्ये घालून पाटणा येथील फतुहा येथे आणले. त्यानंतर तिचा मृतदेह पुनपुन नदीमध्ये फेकून दिला. या पूर्ण प्रकरणाचा गौप्यस्फोट झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी सावत्र वडिलांना अटक केली आहे.

आरोपी सावत्र वडिलांनी मृत मुलीला मारहाण केल्याचे मान्य केले आहे. मात्र तिची हत्या केल्याचा आरोप फेटाळला आहे. तिने मारहाणीनंतर आत्महत्या केल्याचा दावा त्याने केला आहे. दरम्यान, पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.