The seventh daughter gave birth to a baby; Classmate raped by blackmail
सातवीतल्या मुलीने दिला बाळाला जन्म; वर्गमित्राने ब्लॅकमेल करून केला बलात्कार By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 03:47 PM2021-07-07T15:47:12+5:302021-07-07T16:01:31+5:30Join usJoin usNext Rape Case : पश्चिम बंगालच्या नदिया येथून एक लाजीरवाणी घटना समोर आली आहे. जिथे एका १३ वर्षाच्या निरागस मुलीने बाळाला जन्म दिला. सातवीत शिकणार्या तिच्या वर्गमित्राने तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार केला होता. ही बाब नदियाच्या धनताला पोलिस ठाण्यासमोर आली आहे. या घटनेनंतर अल्पवयीन आरोपी आपल्या कुटुंबासमवेत बांगलादेशात पळून गेला आहे. आरोपीचे आजोबा बांगलादेशात राहतात. पीडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे, तिच्या वर्गमित्रांनी इयत्ता आठवीत शिकणाऱ्या मुलीचे लैंगिक शोषण केले आणि त्यानंतर मोबाइल फोनमध्ये हे फोटो सेव्ह करून ब्लॅकमेल केले. या प्रकरणात पीडितेची आई घाबरली आहे आणि तिला न्याय हवा आहे. पीडितेच्या कुटूंबाने धनताला पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार केली आहे. या तक्रारीच्या आधारे संबंधित पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणात आरोपी फरार आहे.टॅग्स :लैंगिक छळलैंगिक शोषणपोलिसप्रेग्नंसीsexual harassmentSexual abusePolicePregnancy