सेक्स वर्करचे व्यावसायिकाने केले लैंगिक शोषण, लाखोंची भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश

By पूनम अपराज | Published: December 16, 2020 08:13 PM2020-12-16T20:13:54+5:302020-12-16T20:23:51+5:30

Crime News : न्यूझीलंडच्या एका सेक्स वर्करने एका व्यावसायिकाविरोधात लैंगिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान येथील मानवाधिकार आयोगाने या सेक्स वर्करला नुकसान भरपाई म्हणून 6 अंकी रक्कम देण्याचे आदेश दिले.

मानवाधिकार आयोगाचे संचालक माइकल टिम्मिंस म्हणाले की, ही देयके आवश्यक असणारी चेतावणी आहेत. ज्यायोगे लक्षात येते की, कोणताही कामगार, जरी तो कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असला तरी कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ केला जाऊ शकत नाही. (Representative Photos:Pixabay)

आणि कामगार असला तरीही त्याला या विरोधात आवाज उठवण्याचा सर्व अधिकार आहे. 

माइकल टिम्मिंस म्हणाले, "आम्ही सर्व व्यवसाय मालकांना आणि त्यांच्या कर्मचार्‍यांना लैंगिक कामगारांच्या अधिकारांची जाणीव व आदर असल्याचे सुनिश्चित करण्यास प्रोत्साहित करतो."

या दंडाचा उद्देश स्त्रीला भावनिक आणि आर्थिक नुकसानभरपाई देणे आहे, असे आयोगाने म्हटले आहे. या महिलेची ओळख आणि या खटल्याची इतर सर्व माहिती आयोगाने गोपनीय ठेवली आहे.

सेक्स वर्करच्या मानवाधिकार कायद्यांतर्गत हा खटला दाखल करण्यात आला होता. मानवाधिकार न्यायाधिकरण म्हणाले, 'कोणत्या संदर्भात केले जात आहे यावर सर्व काही अवलंबून असते. अगदी वेश्या बाजारात अयोग्य आणि अपमानास्पद भाषा वापरली जाऊ शकत नाही.

न्यायाधिकरणाने सांगितले की, " सेक्स वर्करकडून त्याला आपल्या क्लायंटची भाषा आक्षेपार्ह वा अपमानकारक वाटली की नाही हे जाणून घेणे आवश्यक नाही, असे गृहीत धरले जाते. 

कोर्टाने म्हटले आहे की, “एखाद्या वेश्या बाजारातील चुकीचे लैंगिक वर्तन किंवा आपत्तीजनक भाषा किंवा अपमानास्पद मानली गेली नाही तर सेक्स वर्कर कायद्यानुसार त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवले जाईल.”