धक्कादायक! सलमान खुर्शीद 'या' राज्यात चालवत होता दहशतवादाची 'शाळा', एटीएसने केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 07:09 PM2020-06-23T19:09:18+5:302020-06-23T23:00:15+5:30

काश्मीरमध्ये पकडलेला दहशतवादी सलमान खुर्शीद वानी याने बागपत इन्स्टिट्यूटमध्ये टेक्निशियनचे शिक्षण घेतले. वााानी इन्स्टिट्यूटमध्ये दहशतवाद पसरवणारे वर्ग चालवत होता.

ही माहिती उघड होताच यूपी एटीएस आणि यूपी पोलिस सक्रिय झाले आहेत. आता एटीएसचे पोलीस सलमानला घेऊन बागपतलाही जाऊ शकतात. (All Photos :Amar Ujala)

यूपी एटीएसने रविवारी काश्मीरमधून दहशतवादी सलमान खुर्शीद वानीला अटक केली आहे.

चौकशीदरम्यान सलमानने कबूल केले की, पश्चिम यूपीच्या जिल्ह्यांशी त्याचा खोलवर संबंध आहेत. त्यांनी बागपत येथील एका संस्थेत टेक्निशियन म्हणून शिक्षण घेतल्याचे सांगितले.

जेथे सलमान विद्यार्थ्यांना दहशतवादाचे प्रशिक्षण देत असे. हा खुलासा झाल्यानंतर एटीएस सलमानला ट्रान्झिट रिमांडवर लखनऊ येथे आणत आहे. दहशतवादी बागपत जिल्ह्याशी संबंध आल्यानंतर यूपी एसटीएस आणि उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये खळबळ माजली आहे.

दहशतवादी सलमान हा बरेलीच्या इनामुलशीही संबंधित होता - एटीएसने 19 जूनला इनामुलला बरेली येथून अटक केली. तेव्हापासून एटीएस दहशतवादी संघटना आणि त्या संबंधित लोकांचा शोध घेत होती. त्यात हे उघड झाले की, दहशतवादी सलमान हा बरेली येथील रहिवासी असलेेल्या इनामुलशी संबंधित होता.

व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक मेसेंजरवर या दोघांमध्ये झालेले चॅट आढळूूून आले आहे. त्यानंतर एटीएसने सलमानचा शोध सुरू केला. एटीएसने सलमानला काश्मीरमधील त्याच्या घरातून अटक केली आहे. अशी मााहिती आहे की, सलमानचा पश्चिम यूपीमधील अनेक तरुणांशी संबंध आला होता. त्या तरुणांना लव्ह जिहादसाठी भडकवत असे. एटीएस सध्या सलमानची चौकशी करत आहे.

सलमानलाही बागपत येथे आणले जाईल असे सांगितले जात आहे की, एटीएसचा दहशतवादी सलमानला चौकशीसाठी बागपत येथेही आणू शकेल. बागपत इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश कसा मिळाला आणि येथे वास्तव्य करताना त्याने काय केले? एटीएस या सर्वांची माहिती गोळा करण्यात गुंतले आहे.