Shraddha Walker Murder Case : "आफताबने 4 महिने फ्रीजमध्ये ठेवले श्रद्धाचे 35 तुकडे"; जंगलात फेकण्याची 'अशी' सुचली कल्पना By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 04:13 PM 2022-12-06T16:13:45+5:30 2022-12-06T16:28:44+5:30
Shraddha Walker Murder Case : आफताबबाबत आता रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता पुन्हा एकदा या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. आफताब पूनावालाने त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. त्याची नार्को टेस्ट करण्यात आली. आफताबबाबत आता रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता पुन्हा एकदा या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून लगेचच जंगलात फेकले नाही. चौकशीत आफताबने सांगितले की, त्याने सुमारे 4 महिने श्रद्धाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले होते. एवढेच नाही तर हे तुकडे जंगलात टाकता येतील अशी कल्पना त्याला त्याच्या मित्राच्या घरी सुचली.
आफताबने पोलिसांना सांगितले की, श्रद्धाच्या हत्येनंतर तिच्या तुकड्याची विल्हेवाट कशी लावायची हे तो ठरवू शकला नाही. एके दिवशी त्याच्या मित्राच्या घराच्या गच्चीवर फिरत असताना त्याला छत्तरपूरचे जंगल दिसले आणि श्रद्धाचे तुकडे इथेच टाकावेत असे वाटले. त्यानंतर त्याने अनेक दिवस घेऊन हे काम पूर्ण केले.
आफताबने यापूर्वी 18 मे रोजी श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे फ्रिजमध्ये 3 आठवड्यांपर्यंत ठेवले होते, अशी माहिती समोर आली होती. यानंतर त्याने हे तुकडे 16 दिवसांत शहरातील विविध ठिकाणी टाकले. श्रद्धा हत्याकांडात आफताबची नवी मैत्रीण समोर आली. श्रद्धाच्या हत्येशी किंवा तिच्या तुकड्यांशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा तिने केला.
मुलीने सांगितले की, जेव्हा ती आफताबच्या घरी तिला भेटायला यायची तेव्हा आफताबने या घरात श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ठेवले होते याची तिला कल्पना नव्हती. मे महिन्यात श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबने या नवीन मुलीला डेट करायला सुरुवात केली. दोघांची भेट त्याच बंबल एपवर झाली ज्याद्वारे श्रद्धा आणि आफताब यांची भेट झाली.
ही नवीन मैत्रीण ऑक्टोबरमध्ये दोनदा आफताबच्या घरी आली होती. 12 ऑक्टोबरला आफताबने तिला आर्टिफिशियल रिंग दिल्याचेही तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिच्याकडून ही अंगठी जप्त केली असून तिचा जबाब नोंदवला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
आफताबने श्रद्धाचे 35 तुकडे केले 'ते' हत्यार पोलिसांना अखेर सापडलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत आफताबने चायनीज चॉपरने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचं समोर आलं आहे. आरोपी आफताब पूनावाला याची पॉलिग्राफ आणि नार्को चाचणी पूर्ण झाली. नार्को टेस्ट दरम्यान आफताबने श्रद्धाच्या हत्येबाबतची अनेक रहस्य उघड केल्याची माहिती मिळत आहे.
आफताबने श्रद्धाची हत्या केल्यानंतर सर्वात प्रथम तिच्या हाताचे तुकडे केले होते. नार्को टेस्टमध्ये त्याने तुकडे फेकून दिल्याचं सांगितलं. पोलीस आता त्या लोकेशनवर जाऊन हत्याराचा शोध घेत आहेत. पोलिसांनी आफताबच्या फ्लॅटमधून अनेक धारदार हत्यारं जप्त केल्याचा दावा केला आहे. या हत्यारांचा वापर हा श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी केला गेला.
आता पोलीस आफताबने हे चॉपर नेमकं कुठून खरेदी केलं याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. 18 मेच्या आधी हे हत्यारांची खरेदी केली नव्हती ना? याचा देखील पोलीस तपास करत आहेत. जर त्याने त्याआधी हत्यारं घेतल्याचे पुरावे मिळाले तर त्याने कट रचून श्रद्धाची हत्या केल्याचं सिद्ध होईल.
आफताब सातत्याने रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याचं म्हणत आहे. श्रद्धाची हत्या केल्यानंतर अनेक महिने आफताबने तिचा मोबाईल आपल्याकडे ठेवला होता. मुंबई पोलिसांनी जेव्हा त्याला चौकशीसाठी बोलावलं तेव्हा त्याच्याकडे तो फोन होता. पण त्यानंतर त्याने श्रद्धाचा फोन मुंबईच्या समुद्रात फेकल्याचं म्हटलं आहे.