...म्हणून पत्नी आणि ३ मुलांची हत्या करुन बापाने केली आत्महत्या; सुुसाईड नोटमधून खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 04:17 PM 2020-06-05T16:17:28+5:30 2020-06-05T16:25:15+5:30
आर्थिक ओझ्याखाली दबलेल्या घरमालकाने पत्नी आणि तीन मुलांना ठार मारले आणि नंतर आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी घरात ५ मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच गावात खळबळ उडाली. या खळबळजनक घटनेची माहिती मिळताच जिल्हा अधिकारी व पोलिस अधीक्षक उच्च अधिकाऱ्यांसह गावात पोहोचले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्कॉड पथक आले होते. (Photo - Amar Ujala)
हे प्रकरण नगर कोतवाली परिसरातील सफेदाबाद गावचे आहे. विवेक शुक्ला येथे पत्नी आणि तीन मुलांसमवेत राहत होता. विवेक शुक्लाची आई, जी बरेच दिवसांपासून दुसर्या घरात स्वतंत्रपणे राहत होती, बऱ्याच वेळापासून तिला मुलाच्या घरातून आवाज ऐकू आला नाही म्हणून तिने टेरेसवरून खाली अंगणातून पाहिले. त्यावेळी मुलाचा मृतदेह लटकलेला पाहून आईच्या पायाखाली जमीन घसरली आणि तिने आरडाओरडा केला.
आईला रडताना पाहून लहान मुलगा मोहित हा घराच्या आत गेला आणि भाऊ विवेक, त्याची पत्नी अनामिका शुक्ला, त्यांची मुलगी कोयम आणि कोयना आणि मुलगा बबलू यांचा मृतदेह पाहून तो स्तब्ध झाला. मोहित यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी डॉ. आदर्श सिंह आणि पोलिस अधीक्षक डॉ. अरविंद चतुर्वेदी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. तातडीने फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्कॉड पथकाला पाचारण करण्यात आले.
इंग्रजीत लिहिलेली सुसाइड नोट सापडली. सीओ सुशील कुमार सिंह आणि पंकजकुमार सिंग यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. एएसपी आरएस गौतम यांनी सांगितले की, घटनास्थळावारूवरून इंग्रजीमध्ये लिहिलेली एक सुसाइड नोट सापडली आहे.
आर्थिक ताणतणावामुळे आणि कर्जाच्या ओझ्यामुळे विवेक शुक्ला याने स्वत: ला, पत्नी आणि तीन मुलांना ठार मारले आणि आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास केला जात असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे.