संपत्तीच्या हवास्यापोटी सुपारी देऊन पोटच्या मुलानंच केली बापाची हत्या, तर सुनेनं... By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 01:13 PM 2020-06-04T13:13:17+5:30 2020-06-04T13:21:56+5:30
वडिलांची संपत्ती हडपण्यासाठी पछाडलेल्या मुलाने स्वत:च्या बापाच्या हत्येची सुपारी दिली. मुलाकडं पैसे नसल्याने मृतकाच्या सुनेने सुपारीसाठी पैसे दिले. रक्ताच्या नात्यावरुन विश्वास उडवणारी ही घटना उत्तर प्रदेशमधील वाराणसीची आहे
वाराणसीतील ग्रामीण भागातील फूलपूरच्या रमाईपुर गावात १९ मे रोजी भट्टी मालक रामलाल पटेल याला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. बुधवारी या खुनाच्या प्रकरणात पोलिसांनी एक रंजक खुलासा केला आहे.
पोलिसांनी या प्रकरणात दुसऱ्या कोणाला नव्हे तर हत्या झालेल्या मृत व्यक्तीच्या मुलाला अटक केली आहे. त्याच्यावर हत्येचा कट रचणे आणि वडिलांना ठार मारण्याची सुपारी देणे हा आरोप ठेवण्यात आला आहे.
पोलिसांनी भट्टी मालकाचा धाकटा मुलगा लाल बहादुर पटेल याला अटक केली आहे. तसेच ही हत्या करणाऱ्या सुपारी किलर आनंद यादव नावाच्या व्यक्तीलाही पोलिसांनी पिस्तूल आणि काही काडतुसेसह अटक केली आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हत्येचा आरोपी आनंद यादव याला परिसरातून अटक केले. त्याच्या जबाबानंतर आरोपीला सुपारी देणारा मृतक रामलालच्या छोट्या मुलालाही अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुपारी किलर आनंद यादवने सांगितले की, तो सज्जन यादव डी ११ गँगसाठी काम करतो आणि यापूर्वीही तो अनेक खून प्रकरणात तुरूंगात गेला आहे.
रामलाल पटेल यांना ठार मारण्यासाठी दुसऱ्या कोणीही नाही तर खुद्द त्याचा धाकटा मुलगा लाल बहादुर पटेलने सुपारी दिली होती. तसेच सज्जन यादवला अपाचे मोटरसायकल आणि ५० हजार रुपये दिले होते.
लाल बहादुर पटेल याने वडिलांचा खून करण्यासाठी सज्जन यादवला काही एकर जमीन देण्याचीही ऑफर दिली होती. तर आरोपी सज्जने त्याचा दुसरा साथीदार मिथिलेश पटेलच्या मदतीने १९ मे रोजी रामलाल पटेल यांना गोळ्या घालून ठार मारले.
षडयंत्र रचणाऱ्या आरोपी मुलाला पोलिसांनी जेलमध्ये टाकलं, तसेच अन्य अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरु आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही सुपारीसाठीची रक्कम मुलाची पत्नी म्हणजेच मृत व्यक्तीची सूनेने दिली होती.
एसएसपी प्रभाकर चौधरी यांनीही सुरुवातीला लाल बहादुर पटेल याच्या पत्नीने ५० हजार रक्कमेची सुपारीची व्यवस्था केल्याची धक्कादायक माहिती दिली. नंतर या घटनेत सामील झालेल्या इतर सर्व लोकांनाही अटक केली जाईल. सध्या पोलीस ताब्यात असलेल्या अन्य मारेकरी मिथिलेश पटेलची चौकशी करत आहेत.