बाप रे बाप! २ किलो सोनं, महागड्या १६ कार्स...लबाडाच्या घरी सापडली बेसुमार संपत्ती By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 11:20 AM 2021-08-25T11:20:24+5:30 2021-08-25T11:31:40+5:30
दरम्यान तुरूंगात कैद असलेल्या सुकेशजवळ २ मोबाइल आढळून आले. जे फॉरेन्सिक टेस्टसाठी पाठवण्यात आलेत. त्यानंतर चौकशी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आली. २०० कोटी रूपयांची फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखरच्या अनेक ठिकाणांवर ईडीने धाड टाकली. यावेळी छापेमारी मारिया पॉलच्या चेन्नईमध्ये समुद्राच्या ठीक समोर असलेल्या आलिशान बंगल्यावर करण्यात आली. जिथे १६ हायएंड लक्झरी कार्स, ८२.५० लाख रूपये कॅश आणि २ किलो सोन्याचे दागिने आढळून आले.
सुकेश चंद्रशेखरने तुरूंगात बसून अनेक मोठ्या उद्योगपतींना त्यांच्या विरोधात कोर्टात सुरू असलेल्या केसेमध्ये दिलासा देण्याचं सांगून आतापर्यंत सगळ्यांसोबत २०० कोटी रूपयांची डील केली होती. सुकेशने सर्वांना फोन करून स्वत:ला एक मोठा सरकारी अधिकारी असल्याचं सांगितलं होतं.
छापेमारी दरम्यान तुरूंगात कैद असलेल्या सुकेशजवळ २ मोबाइल आढळून आले. जे फॉरेन्सिक टेस्टसाठी पाठवण्यात आलेत. त्यानंतर चौकशी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आली.
याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ८ लोकांना अटक केली होती. ज्यात ४ तुरूंग अधिकारी आणि इतर आरबीएल बॅंकच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता.
ईडीकडून टाकण्यात आलेली रेड आरबीएल बॅंकेचे व्हाइस प्रेसिडेंट कोमल पोदार यांच्या घरीही टाकण्यात आली. तिथे साडे ८२ लाख रूपये कॅश आणि २ किलो सोनं सापडलं. या प्रकरणाचा खुलासा झाल्यावर दिल्ली पोलिसांनी कोमल पोद्दारला अटक केली.
सुकेश आणि लीनाच्या समुद्र किनारी असलेल्या बंगल्यात बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, बेंटले आणि रेंज रोवरसारख्या महागड्या गाड्या सापडल्या. ज्यात रोल्स रॉयस घोस्ट, बेंटले बेंटेगा, फरारी, लॅम्बॉर्गिनी, एसकॅलादे आणि मर्सिडीज एएमी६३ चा समावेशही आहे.
या बंगल्यात कोट्यावधी रूपयांचे इंटेरिअर, मार्बल, होम थिएटर आणि सर्वच अत्याधुनिक सुविधा आहेत. बंगल्यातील कपाटांमध्ये कोट्यावधी रूपये किंमतीचे चष्मे, शूज, बॅग आणि कपडे सापडले.