Sushant Singh Rajput:...म्हणून ‘ते’ दोघं मुंबईत घर शोधत होते; सुशांतबाबत एजेंटने केला नवा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 05:23 PM2020-06-16T17:23:35+5:302020-06-16T17:43:10+5:30

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याने हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अनेक चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही महिन्यापासून सुशांत डिप्रेशनमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे.

रविवारी सुशांतने त्याच्या राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली, त्यावेळी त्याठिकाणी काही मित्रही उपस्थित होते, सुशांतने रुमचा दरवाजा उघडला नसल्याने चावी वाल्याला बोलावून दार उघडलं तेव्हा सुशांतचा मृतदेह पंख्याला लटकल्याचं पाहायला मिळालं.

सुशांत राजपूतच्या मृत्यूनंतर अनेकांना बॉलिवूडमधील गटबाजीवर भाष्य केले, त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक खुलासे समोर आले. सुशांत आणि तिची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती यांच्याबाबत आता नवीन खुलासा समोर आला आहे. हे दोघं लग्न करणार होते असं एजेंट सनी सिंह याने सांगितले.

आजतक या हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना रिया चक्रवर्तीबाबत एजेंट सनी सिंह म्हणाला की, सुशांत आणि रिया लग्न करणार आहेत. आणि म्हणून ते वांद्रेमध्ये घर शोधत होते. दोघेही एकत्र घर शोधत होते.

सुशांत सध्या राहत असलेलं घरही कदाचित दोघांनी एकत्र घेतले असेल. सुशांत सिंग याची भाडे देण्यासंबंधी कोणतीही तक्रार नव्हती.

पण असं असूनही दोघे इतरत्र घराची शोधाशोध करत होते. कारण सोसायटीची तक्रार आली होती. सुशांतच्या घरी लेट नाइट पार्टीज होत असे. यापूर्वीही तो ज्या ठिकाणी रहात होते त्या सोसायटीने या पार्टीजमुळे त्यांना नोटीस पाठवल्या होत्या.

एजेंटने सांगितले की रियाने स्वत: त्याला फोन करून घराबद्दल सांगितले. तसेच सुशांत आणि तिचं लवकरच लग्न होणार आहे, असेही अभिनेत्रीने म्हटलं होतं.

रिया आणि सुशांत मागील काही दिवसांपासून एकत्र होते. दोघेही बर्‍याच वेळा एकत्र दिसले आहेत. सुट्टीच्या दिवशी ते सहलीलाही एकत्र जात असत.

सुशांत अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होता. मात्र काही काळानंतर दोघं वेगळे राहू लागले. दोघांच्या नात्यात काहीतरी बिनसलं होतं.

१४ जूनला सुशांत सिंग राजपूतने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर त्याच्या मृत्यूला जबाबदार कोण याबाबत अनेक चर्चा रंगू लागल्या.

Read in English