भयंकर! आफताबच्या संपर्कात आलेल्या 'त्या' मुलींचं नेमकं काय झालं?; श्रद्धा हत्याकांडात 'नवा ट्विस्ट' By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 02:20 PM 2022-11-19T14:20:42+5:30 2022-11-19T14:36:40+5:30
Shraddha Murder Case : श्रद्धा हत्याकांडाच्या तपासादरम्यान पोलिसांना नवनवीन माहिती मिळत आहे. पोलिसांना आता श्रद्धाचे जुने फोटो आणि Whatsapp चॅट सापडले आहे. लिव्ह इन पार्टनर’च्या खुनामुळे देश हादरलेला असतानच या प्रकरणात आता अनेक कंगोरे पुढे येत आहेत. मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला.
श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली. या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
आफताबला पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर आता आफताबचा जेलमधील एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. त्याला काही दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यात दरम्यान त्याचा जेलमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आफताब जमिनीवर शांतपणे झोपलेला पाहायला मिळत आहे.
पोलिसांनी हत्या प्रकरणात आफताबची चौकशी केली असता त्याच्या बोलण्यात कोणताच खेद जाणवला नाही. त्याला या गोष्टीचा पश्चाताप देखील नसल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी अटक केल्यावर आफताब एकदाच रडला. आफताबचे वडील अमीन पुनावाला कोठडीत त्याची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी आफताबच्या डोळ्यात अश्रू होते अशी माहिती समोर आली आहे.
श्रद्धा हत्याकांडाच्या तपासादरम्यान पोलिसांना नवनवीन माहिती मिळत आहे. पोलिसांना आता श्रद्धाचे जुने फोटो आणि Whatsapp चॅट सापडले आहे. ज्यामध्ये श्रद्धाने आफताब मारत असल्याचे सांगितले. तपासादरम्यान आफताबची चौकशी केल्यानंतर आता आफताब हा सीरियल किलर असण्याची शक्यताही पोलिसांना आहे.
आफताबच्या संपर्कात आलेल्या इतर मुलींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला आहे. त्याच्या डिजिटल फूटप्रिंटच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत. आफताब डेटिंग एपच्या माध्यमातून मुलींना आपल्या जाळ्यात अडकवायचा, त्यामुळे पोलीस त्याची हिस्ट्री चेक करण्यात व्यस्त आहेत.
श्रद्धाची हत्या करून तिचे 35 तुकडे करून जंगलात फेकून देणाऱ्या नराधम आफताबच्या चौकशीदरम्यान सातत्याने नवनवीन माहिती देऊन पोलिसांना हैराण करत आहे. आफताबच्या जबाबात सततच्या विसंगतीमुळे आफताब अजूनही काहीतरी लपवत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
आफताब हा सिरीयल किलर असण्याची दाट शक्यता आहे. त्याच्या वागण्या-बोलण्यातून असे दिसते की, त्याने श्रद्धासोबत जे केले, ते त्याने आधीही केले असावे. पोलिसांनी त्याचा डिजिटल फूटप्रिंट आणि तो ज्या मुलींच्या संपर्कात आला त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
हा नराधम डेटिंग एपच्या माध्यमातून मुलींच्या संपर्कात यायचा. श्रद्धासोबत राहण्याआधीही आफताबचे अनेक मुलींशी संबंध होते. श्रद्धाच्या हत्येनंतर लगेचच त्याने डेटिंग एप्सद्वारे नवीन गर्लफ्रेंड बनवली आणि नंतर इतर मुलींशी चॅट केले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिे आहे.
आफताबच्या शेजाऱ्यांनी मोठा खुलासा केला आहे. आफताब रात्री अचानक पाण्याचा पंप सुरू करायचा असं म्हटलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब अतिशय हुशार आहे. तो चौकशीत प्रश्नांची उत्तर इंग्रजीत देतो. मात्र त्याला हिंदीही उत्तम बोलता येतं. श्रद्धा राहत असलेल्या घरात असलेला पाण्याचा पंप रात्री उशीरा सुरू व्हायचा, असं त्यांच्या शेजाऱ्यांपैकी काहींनी सांगितलं.
आफताब रात्री उशीरा श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करायचा. त्यावेळी होणारा आवाज कोणालाही ऐकू येऊ नये यासाठी पाण्याचा पंप सुरू करायचा असं पोलिसांनी सांगितलं. आफताब जास्त लोकांशी बोलायचा नाही. संध्याकाळी घरी यायचा आणि नेहमीच ऑनलाईन फूड डिलेव्हरी एपच्या माध्यमातून जेवण मागवायचा अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली.
श्रद्धाचा गळा आवळून खून केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आफताब जवळच्या बाजारात गेला. तिथून त्याने एक 300 लीटरचा फ्रीज खरेदी केला. त्यासाठी त्याने क्रेडिट कार्डने 23,500 रुपये दिले. तसेच त्याने चाकू आणि कचरा टाकण्यासाठी असलेल्या पिशव्या विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे.