महिला शिक्षिकेने १४ वर्षीय विद्यार्थ्यासोबत जबरदस्ती ठेवले शरीरसंबंध, CCTV मध्ये रेकॉर्ड झाली घटना By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 01:24 PM 2021-07-08T13:24:57+5:30 2021-07-08T13:30:42+5:30
Women teacher sexually abused teenage student : मीडिया रिपोर्टनुसार, लंच ब्रेकआधी आरोपी मोनिकाने मुलाला तिचे काही अश्लील फोटो पाठवले होते. महिला शिक्षिकेने विद्यार्थ्यालाही त्याचे काही आक्षेपार्ह फोटो मागितले होते. शिक्षकाला देवाचं रूप मानलं जातं. मात्र, ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षिका आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. ज्यात विद्यार्थ्याचा आयुष्य उद्ध्वस्त झालंय.
इथे एका महिला शिक्षकाने शाळेतील १४ वर्षीय विद्यार्थ्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करण्याचा हा सिलसिल अनेक महिन्यांपासून सुरू होता. पोलिसांना तपासातून समजलं की, आरोपी शिक्षिकेने याआधीही अनेक विद्यार्थ्यांचं कथितपणे लैंगिक शोषण केलं आहे.
ऑस्ट्रेलिया (Australia) च्या सिडनी (Sydney) शहरातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका २४ वर्षीय शिक्षिकेने १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण केलं.
या मुलाच्या लैंगिक शोषणाची घटना शाळेत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. त्यानंतरच या घटनेचा खुलासा झाला.
मीडिया रिपोर्टनुसार, लंच ब्रेकआधी आरोपी मोनिकाने मुलाला तिचे काही अश्लील फोटो पाठवले होते. महिला शिक्षिकेने विद्यार्थ्यालाही त्याचे काही आक्षेपार्ह फोटो मागितले होते.
दरम्यान आरोपी शिक्षिका मोनिका एलिजाबेथ आणखीही १० प्रकरणात आरोपी आहे. तिच्यावर १४ ते १६ वयोगटातील अनेक अल्पवयीन मुलांसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे.
गेल्यावर्षी १० जुलैला पोलिसांनी मोनिकाला अटक केली होती. आरोपी महिला मोनिकाला शिक्षा सुनावण्याआधी न्यायाधीशांनी कोर्टात मुलांचे जबाब वाचले.
त्यात लिहिलं होतं की, या शिक्षिकेमुळे त्यांचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. त्याला शाळा सोडणं भाग पडलं. कारण इतर मुले त्याला चिडवत होते.
कोर्टाने मोनिका एलिजाबेथला दोषी ठरवत ४ वर्षे आणि ९ महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. २ वर्षे ५ महिन्यांपर्यंत मोनिकाला पेरोल मिळणार नाही.