भयानक! एकाच घरात ४ हत्या; मुलानेच आई-वडील, बहीण अन् आजीला संपवलं, पोलीस हादरले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 03:55 PM2022-11-23T15:55:27+5:302022-11-23T15:58:50+5:30

दिल्लीच्या पालम भागात युवकानं कायमची नोकरी मिळत नसल्याने झालेल्या भांडणातून त्याच्याच कुटुंबातील ४ जणांची निर्दयी हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात आई वडील, आजी-बहीण यांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ९ ते १० वाजता आरोपीनं हे क्रूर कृत्य केले. कारण त्यावेळीच वरच्या मजल्यावरून ओरडण्याचा आवाज येत असल्याचं शेजाऱ्यांना येत होता. लोकांनी साडे दहाच्या सुमारास या प्रकाराची माहिती स्थानिक पोलिसांना दिली.

स्थानिकांच्या सूचनेवरून तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले. तेव्हा घराच्या वरच्या मजल्यावरून आवाज ऐकायला येत होता. पोलीस धावत त्याठिकाणी पोहचले तेव्हा आरोपी युवक तिथून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता तेव्हा स्थानिकांच्या मदतीने आरोपीला पकडण्यात आले.

त्यानंतर जेव्हा पोलिसांनी घरात पाहिले तेव्हा समोरील दृश्य पाहून ते हादरले. खोलीत ४ मृतदेह होते. ज्यांचा मृत्यू झाला त्यात दिनेश, त्याची पत्नी दर्शना, ७५ वर्षीय आजी दिवानोदेवी, मुलगी उर्वशी सैनी यांचा समावेश होता. हे सगळे एकाच मजल्यावर राहत होते.

कुटुंबात दिनेश यांचा मुलगा केशवही राहायचा. ज्याने हे भयानक कृत्य केले. लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केशव हा व्यसनाधीन होता. ज्यामुळे घरात वारंवार भांडणं व्हायची. काही दिवसांपूर्वी नशेत केशव आजीकडे पैशांची मागणी करत असल्याचं प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

आजीने केशवला पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा केशव रागात होता. आरोपीच्या चुलत भावाने सांगितले की, जेव्हा काकाच्या घरातून ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता तेव्हा आम्ही धावत धावत काकाच्या घरच्या दिशेने गेलो.

जेव्हा वरच्या मजल्यावर पोहोचलो तेव्हा घराचा दरवाजा बंद असल्याचे दिसलं. दार ठोठावल्यावर आरोपी केशवने त्यांना तेथून निघून जाण्यास सांगितले. कुलदीपला काहीतरी संशय आल्याने त्याने लगेच पीसीआर कॉल केला. पोलिसांच्या उपस्थितीत दरवाजा तोडला असता, कुटुंबातील चौघेजण वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आणि बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळून आले.

कुटुंबीयांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी अटक केली. पोलीस या हत्येचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. आरोपी केशव काही काळापूर्वी नोकरी करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याची नोकरीही गेली. नशेत तो कुटुंबीयांशी सतत भांडत असत. शिवीगाळ करायचा

केशवला अंमली पदार्थांचे व्यसन होते आणि ड्रग्जसाठी पैसे न दिल्याने घरात वारंवार भांडणे होत असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी त्याने आजीकडे पैसेही मागितले होते पण आजीने नकार दिला. घरात तो रागावायचा आणि अनेकदा भांडण करत असे.

हत्येपूर्वीही घरात भांडणाचे आवाज येत होते आणि त्यानंतर मुलाने आजी दिवाना देवी, वडील दिनेश, आई दर्शना आणि १८ वर्षीय बहीण उर्वशी यांची हत्या केली. आरोपी केशवचे काका ईश्वर यांनी सांगितले की, चौघांची हत्या केल्यानंतर तो ग्रीलवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा पोलिसांनी त्याला पकडला.

काही महिन्यांपूर्वी केशवचे गर्लफ्रेंडसोबतही ब्रेकअप झाले होते. त्यामुळे तो खूप त्रस्त होता. घटनेच्या वेळी घरातील सर्व सदस्य रात्री जागे होते. यादरम्यान भांडण झाले, त्यानंतर त्याने हे क्रूर कृत्य करत घरातील सर्व सदस्य एक एक करून मारले. हत्येचा क्रम काय होता, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.