अंडरवर्ल्ड असो वा मॅच फिक्सिंग... गुन्हेगारांना पुरून उरलेले 'सुपरकॉप' हिमांशू रॉय By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 03:33 PM 2019-05-11T15:33:53+5:30 2019-05-11T16:11:55+5:30
सुपरकॉप हिमांशू रॉय यांचा पहिला स्मृतिदिन
आजारपणाला कंटाळून सुपरकॉप असलेल्या हिमांशू रॉय यांनी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने राहत्या घरी गोळ्या झाडून आत्महत्या केली.
फिटनेसवर प्रचंड भर देणारे हिमांशू रॉय यांना हाडांचा कॅन्सर झाला होता
एटीएसमध्ये असताना त्यांना या आजारपणाने ग्रासले, त्यानंतर २ वर्ष त्यांनी वैद्यकीय रजा घेतली आणि अमेरिकेत उपचारासाठी गेले होते
रॉय हे १९८८च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. हुशार आणि धाडसी अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.
१९९५ साली त्यांनी नाशिक (ग्रामीण) पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिलं, त्यानंतर अहमदनगरचे पोलीस अधीक्षक, २००९ साली मुंबईत गुन्हे शाखेचे पोलीस सहआयुक्त, महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख म्हणून पदावर कार्यरत होते. नंतर राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक पद सांभाळलं.
पत्रकार जे. डे. हत्याकांडापासून ते विंदू दारा सिंगच्या आयपीएल मॅच फिक्सिंग, शक्ती मिल गँगरेप प्रकरणापर्यंतच्या अनेक केसेस त्यांनी हाताळल्या होत्या. विंदू दारा सिंगला त्यांनी अटक केली होती.
दाऊदचा भाऊ इकबाल कासकरचा ड्रायव्हर अरिफवरील गोळीबार प्रकरण, विजय पालांडे, लैला खान मर्डर केस आणि अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्या प्रकरण आदी प्रकरणं सोडविण्यात रॉय यांची महत्वपूर्ण भूमिका होती.
सुपरकॉप हिमांशू रॉय यांना ''लोकमत'' परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली