सीबीआयकडे तपासाचा गुंता सोडवण्यासाठी आलेले देशभरातील हे आहेत अतिसंवेदनशील गुन्हे By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 08:50 PM 2020-08-19T20:50:34+5:30 2020-08-19T22:19:45+5:30
देशभरातील अनेक संवेदनशील आणि अतिसंवेदनशील गुन्हांचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. सुशांत सिंग राजपूत मृत्यूचा तपास देखील आजच सुप्रीम कोर्टाने सीबीआयला दिला आहे. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यावर लाचखोरीचे आरोप उघडकीस आल्यानंतर त्यांना रजेवर पाठविण्यात आले, त्यांची सीबीआयकडून चौकशी करण्यात आली. वर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून पुन्हा कामावर पुन्हा कामावर रुजू करण्यात आले होते आणि अस्थाना यांची त्यांच्यावरील एफआयआर रद्द करण्याची विनंती फेटाळून लावली होती. या प्रकरणात चर्चेसाठी सीबीआयचे संचालक अलोक वर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि अस्थाना यांच्यावरील आरोपांची थोडक्यात माहिती दिली. अस्थाना यांच्यावर हैदराबाद येथील व्यावसायीक सना सतिशबाबू यांनी ५ कोटी रुपयांची लाच घेतल्याची तक्रार दाखल केली होती.
अस्थाना यांच्यावर हैदराबाद येथील व्यावसायीक सना सतिशबाबू यांनी ५ कोटी रुपयांची लाच घेतल्याची तक्रार दाखल केली होती.तक्रारदाराने आरोप केला होता की, दुबईतील दोघे भाऊ मनोज प्रसाद आणि सोमेश प्रसाद यांनी आपल्याकडून ५ कोटी रुपये मागितले होते. अस्थाना यांच्यावतीने त्यांनी ही लाच मागितल्याचा दावा त्याने केला होता. बाबूने हे पैसे दिल्याचा दावाही केला आहे. या प्रकरणात मांस निर्यातदार मोईन कुरेशी याच्याशीही संबंध अल्याप्रकरणी तक्रारही दाखल झाली होती.
IRCTC Scam : लालू रेल्वे मंत्री असताना निविदा प्रक्रियेत हेराफेरी केल्याप्रकरणी सीबीआयने त्यांच्यावर खटला दाखल केला होता. आयआरसीटीसी हॉटेल्सचे कंत्राट काढताना त्यामध्ये मोट्या प्रमाणवर घोटाळा झाला असल्याचे निदर्शनास आले होते.२००६ साली लालू रेल्वे मंत्री असताना त्यांनी रांची आणि पुरी समवेत अन्य रेल्वे हॉटेल्सचा विकास आणि दुरूस्तीचे कॉन्ट्रॅक्ट खाजगी कंपन्यांना दिले असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
Sterling Biotech Case - स्टर्लिंग बायोटेक कंपनी लिमिटेड आणि संदेसरा समुहाचे प्रमुख प्रमोटर नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आणि दिप्ती संदेसरा यांनी बनावट कंपन्या तयार करून बँकांना 14 हजार 500 कोटींचा गंडा घातला आहे. सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने स्टर्लिंग बायोटिकचे गुंतवणूकदार नितीन, चेतन आणि दिप्ती संदेसरा, राजभूषण ओमप्रकाश दीक्षित, विलास जोशी, चार्टर्ड अकाउंटंट हेमंत हठी, आंध्र बँकेंचे माजी संचालक अनुप गर्ग आणि अन्य काही लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अलीकडेच स्टरलिंग बायोटेक/ संदेसरा घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या दिल्लीतील घरावर ईडीने छापेमारी करून पटेल यांची चौकशी देखील करण्यात आली होती.
विजय मल्ल्या यांच्यावर बँकांचे ९००० कोटी रुपयांहून अधिक रकमेचे कर्ज आहे. मल्ल्याला फरार देखील घोषित करण्यात आले आहे. २०१७ साली सीबीआय आणि ईडीची एक संयुक्त टीम विजय मल्ल्याविरुद्ध ताजे आणि ठोस पुरावे गोळा करण्यासाठी लंडनमध्ये दाखल झाली होती. स्टेट बँक ऑफ इंडियाने केलेल्या तक्रारीनंतर सीबीआयने विजय मल्ल्याविरोधात भा. दं. वि. कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
अगुस्ता वेस्टलँड ३६०० कोटींचा घोटाळा - अगुस्ता वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यात अटकेत असलेला मध्यस्थ ख्रिश्चियन मिशेल याची अंतरिम जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल महिन्यात फेटाळली होती. या लाच प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे हाती लागले असल्याचा दावा सीबीआयने केला होता. २०१७ साली सीबीआयने आरोपपत्र दाखल केले होते. ख्रिश्चन मिशेल आणि गुइडो हाश्के यांनी भारतात तब्बल ४३२ कोटी रुपये लाच म्हणून दिली असल्याचे सीबीआयने म्हटले होते.
रॉबर्ट वाड्रा प्रकरण - काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात सामील आहेत. हरियाणातल्या गुडगावमधल्या जमीन घोटाळाप्रकरणी रॉबर्ट वाड्रा आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे.FIR मध्ये DLF ही कंपनी आणि ओंकारेश्वर प्रॉपर्टीज यांचंही नाव सामील आहे. राजस्थान सरकारने याबाबत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले रॉबर्ट वाड्रा यांना दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयानं दिलासा दिला होता, वैद्यकीय उपचारांकरिता सहा आठवड्यांसाठी विदेशात जाण्यास त्यांना न्यायालयानं परवानगी दिली होती.
पीएनबी घोटाळा - नीरव मोदी आणि मेहुल चौकसी या हिरे व्यापारातील मामा-भाच्याच्या जोडीशी संबंधित कंपन्यांना अनियमित पद्धतीने दिलेली हजारो कोटी रुपयांची कर्जे बुडित गेल्याप्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) पंजाब नॅशनल बँक या सरकारी बँकेतील राजेश जिंदाल या महाव्यवस्थापक हुद्यावरील अधिकाऱ्यास अटक केली होती. पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीविरोधात कडक कारवाई सुरू झाली आहे. 13,000 कोटी रुपयांच्या पीएनबी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीच्या प्रत्यर्पणाच्या सुनावणीला लंडनमध्ये सुरुवात होणार होती.