गावाच्या मधोमध असलेलं एटीएम मशीन चोरांनी उचलून नेलं, एक दिवसाआधीच भरले होते १५ लाख रूपये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 11:58 AM2021-06-26T11:58:01+5:302021-06-26T12:20:18+5:30

राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्याच्या बिलाडा क्षेत्रातील भावी गावात गुरूवारी रात्री उचलून नेण्यात आलेल्या एटीएममध्ये साधारण १५ लाख रूपये होते.

राजस्थानातील एका गावाच्या मधोमध असलेली एटीएम मशीन चोर घेऊन गेले आणि कुणाला याचा पत्ताही लागला नाही. एटीएममध्ये एक दिवसआधीच साधारण १५ लाख रूपये टाकले होते. असा अंदाज आहे की, चोरांनी एटीएम मशीन काढण्यासाठी लोखंडी साखळीची मदत घेतली. कारला साखळी बांधून मशीन तोडून घेऊन गेले.

राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्याच्या बिलाडा क्षेत्रातील भावी गावात गुरूवारी रात्री उचलून नेण्यात आलेल्या एटीएममध्ये साधारण १५ लाख रूपये होते.

एटीएममध्ये इतकी रक्कम काही दिवसांपूर्वीच जमा करण्यात आली होती. अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की, हे एटीएम आधीपासून चोरांच्या निशाण्यावर होतं. मात्र, आश्चर्याची बाब ही आहे की, गावाच्या मधोमध असलेलं एटीएम मशीन उचलून नेताना कुणालाच कशी खबर लागली नाही.

एटीएम मशीन काढण्यासाठी चोरांना खूप वेळ लागला. तरी ही संपूर्ण घटना कुणीच बघितली नाही.

एटीएममशीनमध्ये कोणताही कॅमेरा नव्हता. त्यामुळे पोलिसांकडे केवळ गावातील गल्ल्यांमध्ये असलेल्या सीसीटीव्हीचं फुटेज आहे. ज्यात चोरांची कार दिसत आहे. त्या आधारावर त्यांचा शोध घेतला जात आहे. ही घटना गुरूवारी रात्री २ वाजता घडली.

घटनास्थळी गाडी मागे-पुढे केल्याचे अनेक निशाण आहेत. ज्यामुळे अंदाज लावला जात आहे की, मशीन काढण्यासाठी मशीन दोराने किंवा लोखंडी साखळीने बांधली असावी आणि नंतर ती कारने खेचून काढली असावी.

पोलीस वेगवेगळ्या टीम तयार करून चोरांचा शोध घेत आहेत.