Aurangabad: प्रशिक्षणार्थी एअर हॉस्टेसने बहीणीची छेड काढणाऱ्या मजनूला धू धू धुतले, एवढे की.... By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 12:22 PM 2021-06-27T12:22:12+5:30 2021-06-27T12:29:16+5:30
Aurangabad news: सूतगिरणी चौकात शुक्रवारी एका तरुणीची दोन रोड रोमिओंनी छेड काढली. ती जाब विचारत होतीच तो तिची छोटी बहीण तिथे आली आणि अचानक तेथील वातावरणच बदलेले. रस्त्याने जाणाऱ्या तरुणींची छेड काढण्याचे प्रकार वाढले आहेत. तरुणी भीतीने किंवा लाजेखातर यास विरोध करत नसल्याने आणि तिथे असलेल्या लोकांनी अशा छेडछाडींकडे दुर्लक्ष केल्याने या रोड रोमिओंचे धाडस वाढू लागले आहे. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये घडला आहे.
सूतगिरणी चौकात शुक्रवारी एका तरुणीची दोन रोड रोमिओंनी छेड काढली. ती जाब विचारत होतीच तो तिची छोटी बहीण तिथे आली आणि अचानक तेथील वातावरणच बदलेले.
छोट्या बहीणीने रौद्र रूप घेत दोन पैकी एका रोड रोमिओला चोपण्यास सुरुवात केली. जवळपास १५ मिनिटे हा लाथा-बुक्क्यांचा प्रहार सुरु होता. दुसऱ्या रोमिओनेही काही प्रमाणात मार खाल्ला. मात्र, नंतर तो दुचाकी तिथेच टाकून पसार झाला.
झाले असे की ३३ वर्षीय तरुणी सूतगिरणी चौकातील रस्त्यावरून स्कूटरवरून जात होती. तिच्यासोबत छोटा भाऊ होता. ती त्याला कोचिंग क्लासला सोडण्यासाठी जात होती. याचवेळी दोन रोड रोमिओंनी तिचा पाठलाग सुरु केला.
तिच्या हे लक्षात आले, परंतू कुठेतरी ते थांबतील असे वाटल्याने ती पुढे जात राहिली. यामुळे या रोड रोमिओंचे धाडसही वाढू लागले होते. अश्लील हातवारे करत, अश्लील शब्द वापरण्यास सुरुवात केली. याचवेळी त्या तरुणीने थांबत फोनवरून तिच्या धाकट्या बहिणीला हा प्रकार सांगितला होता.
धाकट्या बहीणीने तिला पुढे जात रहा, मी पोहोचतेच असे सांगितले. अखेर मोठ्या बहीणीने हद्द झाल्याने त्या टवाळखोरांना थांबून जाब विचारला. तेवढ्यात धाकटी बहीणही तिथे पोहोचली. नंतर पुढे जे घडले ते रोड रोमिओंनी स्वप्नातही पाहिले नसेल.
हेच का ते दोघे असे म्हणत धाकटीने एकाला बाजुला ओढून दणादण लाथा बुक्क्या हाणायला सुरुवात केली. दुसऱ्यालाही प्रसाद दिला, परंतू तो पळून गेला. तोवर बघ्यांची गर्दी जमू लागली. यातच कोणीतरी या धाकट्या रणरागिणीच्या रौद्रावताराचा व्हिडीओ काढला.
धाकटीचा चोप मिळत असताना पहिला रोड रोमिओ मोठीच्या हातापाया पडून माफी मागू लागला होता. नंतर तो देखील तिथून पळून गेला. सुमारे अर्धा तास या रोड रोमिओंना चांगला धडा शिकविला गेला.
धाकटीने य़ा आधीही एकदा चोपलेले.... धाकटी ही २५ वर्षांची आहे. ती पुण्यात एअर हॉस्टेसचे प्रशिक्षण घेत आहे. तिने दोन वर्षांपूर्वी मैत्रिणीची छेड काढणाऱ्या मजनूलाही चांगलाच चोप दिला होता.
कालच्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये धाकटी त्या रोमिओला चोप देत असताना मोठी तिला आवरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या काळात काहींनी रोमिओंवर आपलाही हात साफ करून घेतला.