पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाने त्रस्त पतीने फेसबुकवर सुसाईट नोट लिहून संपवले आयुष्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 04:44 PM2020-05-22T16:44:04+5:302020-05-22T16:49:26+5:30

आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. 

पत्नीच्या अवैध संबंधामुळे दु: खी होऊन पतीने फेसबुकवर प्रथम सुसाईड नोट लिहली, त्यानंतर विष प्राशन करून आत्महत्या केली. मृत्यूनंतर वडिलांनी सुसाईड नोटच्या आधारे आपल्या सून व सासरांविरूद्ध एफआयआर दाखल केला.

पत्नीच्या अवैध संबंधांमुळे नवऱ्याला त्रास झाला, फेसबुकवर सुसाईड नोट लिहून त्याचा मृत्यू झाला ही खळबळजनक घटना बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील आहे.

बिहारमधील वैशाली जिल्ह्यात राहणाऱ्या रणजितचे 5 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा देखील आहे, पण याचदरम्यान रणजितला त्याच्या पत्नीच्या विवाहबाह्य प्रेमसंबंधाचा सुगावा लागला. 

रणजितच्या वडिलांनी मुलाच्या मृत्यूनंतर सुसाईड नोटचा आधार घेत सून आणि सासरच्या लोकांवर आरोप ठेवत गुन्हा दाखल केला. सुसाईड नोटमध्ये मुलाने सूनच्या अवैध संबंधांची माहिती दिली.

वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदविला. आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Read in English