अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या नव्या कथित गर्लफ्रेंडने गँगस्टर गुडिया म्हणून निर्माण केलीय ओळख

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 04:52 PM2020-08-26T16:52:09+5:302020-08-26T17:18:00+5:30

अंडरवर्ल्ड डॉन आणि सिनेमा यांच्यातील संबंध खूपच सलोख्याचे राहिलेले आहेत. मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊद इब्राहिमचे नाव बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले आहे.

असं म्हणतात की दाऊदने आपल्या ओळखीच्या जोरावर त्या अभिनेत्रींना मोठ्या चित्रपटांमध्ये भूमिका मिळवून दिली आहे. (All photos - @mehwishhayatofficial instagram)

आता दाऊदचे नाव पाकिस्तानी अभिनेत्री 'ग्लॅमरस गर्ल' महविश हयातसोबत जोडले गेले  आहे.

मागील वर्षी महविश हयात यांना पाकिस्तानच्या नागरी पुरस्कारांपैकी एक तमगा-ए-इम्तियाज प्रदान करण्यात आला.

कारकीर्दीच्या सुरूवातीला महविश हयातने आयटम नंबर केला. महविश हे 37 वर्षांची आहेत, ती दाऊदपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे.

तिच्या लूकसाठी परिचित असलेल्या हयात ही देखील पाकिस्तानमधील टॉप सिंगिंग स्टारपैकी एक आहे आणि बर्‍याचदा काही नामांकित सेलिब्रिटींचे कार्यक्रम आयोजित करते. 

महविशला गँगस्टर डॉल म्हणूनही ओळखले जाते. याशिवाय महविश हयात 'मांजर' म्हणून प्रसिद्ध आहे. कारण २०१४ साली आलेल्या "ना मालूम अफ्राद" या चित्रपटात महविशने मांजरीची भूमिका केली होती.

महविश हयातचे  २००९ मध्ये 'इंशाअल्लाह' हा चित्रपट, २०१५ ला जवानी फिर नहीं आनी, २०१६ एक्टर इन लॉ, २०१६ मध्ये' 'टीम', २०१७ मध्ये  '' पंजाब नहीं जंगी 'आणि २०१८' ला  'जवानी फिर नहीं आनी -२, लोड वेडिंग ' हे चित्रपट प्रदर्शित झाले. 

दाऊद पाकिस्तानच्या चित्रपटसृष्टीला पैसा पुरवत असल्याचे म्हटले जाते. कराची आणि लाहोरमध्ये त्याचा अनेक बडे निर्माते आणि दिग्दर्शकांशी संपर्क आहे.

सोशल मीडियावर हयातला खूप ट्रोल केले जात आहे. ट्विटरवर ट्रोल झाल्यानंतर हयात म्हणाली की, तिच्याविरूद्ध कट रचला जात आहे.