कोरोनात व्यवसाय ठप्प, भाजीवाला बनला 'महाठग'; वर्क फ्रॉम होमचं आमिष दाखवून 21 कोटींचा गंडा By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 05:09 PM 2023-11-05T17:09:07+5:30 2023-11-05T17:35:14+5:30
कोरोनाच्या काळात व्यवसाय ठप्प झाला, त्याच वेळी एका भाजीविक्रेत्याने अनेकांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनाच्या काळात व्यवसाय ठप्प झाला, त्याच वेळी एका भाजीविक्रेत्याने अनेकांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 6 महिन्यातच त्याने लोकांची 21 कोटींची फसवणूक केली. या मोठ्या फसवणुकीच्या आरोपाखाली पोलिसांनी 27 वर्षीय भाजीविक्रेता ऋषभ शर्मा याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने 10 राज्यांतील लोकांना वर्क फ्रॉम होम देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली. फसवणुकीच्या 37 गुन्ह्यांमध्ये त्याचा थेट सहभाग असल्याचं पोलिसांनी सांगितले, तर इतर 855 प्रकरणांमध्येही त्याची भूमिका उघडकीस आली आहे.
उत्तराखंडचे पोलिस अधिकारी अंकुश मिश्रा य़ांनी दिलेल्या माहितीनुसार, "काही वर्षांपूर्वी ऋषभ फरीदाबादमध्ये भाज्या आणि फळे विकायचा. इतर अनेक व्यावसायिकांप्रमाणेच त्यालाही कोविड महामारीच्या काळात प्रचंड नुकसान सोसावे लागले."
"आपला व्यवसाय बंद करावा लागला. पुढील काही महिन्यांसाठी, त्याने आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी विविध WFH ऑफरची मदत घेतली. तेव्हा ऋषभला एक जुना मित्र भेटाला जो आधीपासून ऑनलाईन फसवणूक करत होता.
"ऋषभने फसवणूक करायला सुरुवात केल्यापासून अवघ्या सहा महिन्यांत त्याने 21 कोटी रुपये कमावले आहेत. डेहराडूनचा एक व्यापारी होता, ज्याची त्याने 20 लाख रुपयांची फसवणूक केली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. 28 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती."
वेगळ्या प्रकारची फसवणूक करून, ऋषभने ‘मॅरियट बोनवॉय’ – marriotwork.com ची बनावट वेबसाइट तयार केली. ती हॉटेल चेनच्या मूळ वेबसाइट marriot.com सारखी दिसत होती.
ऋषभने 4 ऑगस्ट रोजी त्या व्यावसायिकाला WhatsApp वर एक मेसेज पाठवला. घरून काम करण्याची संधी देणार्या ‘मॅरियट बोनवॉय’ हॉटेल ग्रुपसाठी रिव्यू लिहिण्याचा पार्ट टाईम जॉब असल्याचं त्यामध्ये सांगितलं.
फसवणूक झालेल्या व्यक्तीने तक्रारीत म्हटलं आहे की, 'ऑफर खरी वाटत असल्याने मी मेसेजसह दिलेल्या नंबरवर कॉल केला. एका व्यक्तीने स्वतःची ओळख ऋषभ शर्मा अशी दिली, जो मॅरियट बोनवॉयचा प्रतिनिधी होता. त्याने माझी त्याच्या सहकारी सोनियाशी ओळख करून दिली.
सुरुवातीला त्या व्यावसायिकाला 10 हजार रुपये देण्यात आले. दुसऱ्यांदाही त्याला पैसे पाठवण्यात आले. यानंतर व्यावसायिकाला गुंतवणूक वाढवण्यास सांगण्यात आले आणि अशा प्रकारे गुंतवणुकीचे प्रमाण वाढतच गेले.
जेव्हा जेव्हा तो व्यवसायिक परताव्याबद्दल बोलायचा तेव्हा त्याला सर्व पैसे काही महिन्यांत दुप्पट होतील असं सांगून फसवलं गेलं, मात्र नंतर त्याला संशय आला तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि त्याने आधीच 20 लाख रुपये भरले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ कोणत्याही व्यक्तीला फोन करून पैशाचे आमिष दाखवून फसवायचा. ऋषभचे बँक डिटेल्स ट्रेस केले असता त्याचे लोकेशन गुरुग्राम असल्याचे आढळून आले.
ऋषभचा कॉल ज्याने उचलला तो गुंतवणूक घोटाळ्यात अडकायचा. ऋषभने आपले सर्व पैसे क्रिप्टोच्या रूपात चीनला पाठवले होते. तो एका आंतरराष्ट्रीय गँगचा एजंट होता, ज्याच्याकडे खऱ्या मास्टरमाईंडची कोणतीही माहिती नव्हती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.