Violent quarrels over extramarital affairs, eventually killing his wife
विवाहबाह्य संबंधावरून नेहमी व्हायची कडाक्याचं भांडणं, अखेर पत्नीची केली सपासप वार केली हत्या By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 08:40 PM2020-06-16T20:40:41+5:302020-06-16T20:48:31+5:30Join usJoin usNext अवैध विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरून पतीने ३५ वर्षांच्या आपल्या पत्नीची हत्या केली आहे. मिठाईलाल असे मारेकरी नवऱ्याचे नाव आहे. याबाबत मृत पत्नीच्या मुलीने पोलिसात तक्रार दिली आहे. ही खळबळजनक घटना लखनऊच्या ठाकूरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. परस्पर मतभेद आणि पती - पत्नीच्या नात्यावर विश्वास नसल्यामुळे प्रत्येक दिवशी आई आणि वडिलांमध्ये वाद होत असत असे मृत महिलेच्या मुलीने सांगितले. रविवारी मुलगी औषध घेण्यासाठी गेली असता तिचा भाऊ घराबाहेर खेळत होता. त्यानंतर आरोपी मिठाईलालने पत्नीवर धारदार शस्त्राने सपासप वार करून तिची हत्या केली. आरोपीने या हत्याकांडात धारदार शस्त्रास्त्रे वापरली. याशिवाय स्थानिक लोकांनीही ही घटना पाहिली असून आरोपी तेथून पळून गेला आहे. स्थानिक लोकांची पोलीस चौकशी करीत असून आरोपीला लवकरात लवकर अटक करून पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणात, पोलीस उपायुक्त सर्वश्रेष्ठ त्रिपाठी म्हणाले की, ठाकूरगंज पोलिस स्टेशनअंतर्गत बरौरा हुसैन वाडीजवळ ही हत्या झाली, या प्रकरणात पती स्वत: आरोपी आहे आणि त्याने पत्नी पार्वतीची हत्या केली आहे. आम्ही आरोपीला अटक करून शक्य तितक्या लवकर कारवाई करू.टॅग्स :खूनपोलिसMurderPolice