मस्ती नडली! कार चालवत दारु पित होता; अपघातात गर्लफ्रेंडसह तिघांचा मृत्यू By हेमंत बावकर | Published: October 28, 2020 04:07 PM 2020-10-28T16:07:36+5:30 2020-10-28T16:13:06+5:30
Drunk and Drive : भारतासह अमेरिकेत मद्यपान करून वाहने चालविणे कायद्याने गुन्हा आहे. यासाठी दंड, लायसन निलंबित आणि तुरुंगवारीची शिक्षा आहे. तरीही अनेकदा नाईट आऊट, एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावणे आदी ठिकाणी मद्यप्राशन केले जाते. मद्यपान करून कार किंवा कोणतेही वाहन चालविणे किती धोक्याचे असते याचा प्रत्यय महामार्गांवरील अपघात पाहिल्यानंतर येतो. अनेकदा हे अपघात मद्यपान करून वाहने चालविल्याने होतात. अनेकांना खूप आत्मविश्वास देखील असतो, दारू पिऊन सेफ गाडी चालविण्याचा.
असाच फाजिल आत्मविश्वास अमेरिकेच्या एका व्यक्तीला खूपच भारी पडला आहे. शेजारी बसलेल्या गर्लफ्रेंडसह तिघांना प्राण गमवावे लागले आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे हा व्यक्ती बिअर पित असताना फेसबुक लाईव्ह करत होता. या लाईव्हमध्ये तो म्हणत होता, की मी पिल्यानंतर खूप चांगले ड्रायव्हिंग करतो.
भारतासह अमेरिकेत मद्यपान करून वाहने चालविणे कायद्याने गुन्हा आहे. यासाठी दंड, लायसन निलंबित आणि तुरुंगवारीची शिक्षा आहे. तरीही अनेकदा नाईट आऊट, एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावणे आदी ठिकाणी मद्यप्राशन केले जाते. बऱ्याचदा वाहनातदेखील मद्यपान केले जाते. जे धोकादायक आहे.
अमेरिकेचा हा व्यक्ती कॅमिलो मोरेजॉन त्याच्या गर्लफ्रेंडसह जात होता. यावेळी त्याच्यासोबत मित्रही होते. फेसबुक लाईव्ह करत असताना त्याची कार एका व्हॅनवर जाऊन आदळली.
रविवारी ही घटना टेक्सासच्या रस्त्यावर घडली. कॅमिलोचे वय 47 वर्षे आहे.
त्याची कार ज्या पिकअप ट्रकला आदळली त्याच्या चालकालाही गंभीर दुखापत झाली आहे. तर कारचा चालक कॅमिलोवर दारू पिऊन हत्या केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
अपघातात कॅमिलोलाही गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
पोलिसांना संशय आहे की, दारु विकण्याचा वेळ संपल्यानंतर कोणत्यातरी बारने या जोडप्याला बिअर विकली होती.
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार कॅमिलोने फेसबुक लाईव्ह केल्यानंतर सहाव्या मिनिटाला अपघात झाला. यामध्ये त्याच्या गर्लफ्रेंडसह तिघांचा मृत्यू झाला.