CBD आणि MDMA म्हणजे काय? रिया चक्रवर्तीच्या चॅटमध्ये या दोन ड्रग्सचा अस्पष्ट उल्लेख, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 08:17 PM2020-08-26T20:17:10+5:302020-08-26T20:30:46+5:30

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी रोज नवं खुलासे होतायेत. मंगळवारी या प्रकरणातील एक मोठा खुलासा झाला. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी अमलीपदार्थ सेवन व तस्करीत सहभाग असल्याचा संशय सक्तवसुली संचालनालयाला (ईडी ) आहे. रियाकडून जप्त केलेल्या दोन मोबाईलपैकी एकामधील व्हाट्सअपचॅटमध्ये अमली पदार्थाबाबत अस्पष्ट उल्लेख आहे.

अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि जया शाह यांचे व्हॉट्सएप चॅट सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. या चॅटमध्ये सीबीडी आणि एमडीएमए या दोन अस्पष्ट ड्रग्सचा उल्लेख आहे. चहा किंवा कॉफीमध्ये CBD Oil मिसळून देण्याचा उल्लेख यांच्या चॅटमध्ये आहे.

कॅनबिडिओल (CBD) 1940 मध्ये निर्माण करण्यात आलेलं एक phytocannabinoid आहे. हे ११३ annabinoids मधील एक आहे. भांग आणि गांज्याच्या झाडांमध्ये याचा वापर केला जातो.

२०१९ मध्ये सीबीडीवर एक क्लिनिकल रिसर्च करण्यात आला होता. अतिकाळजी, मूव्हमेंट डिसॉर्डर आणि वेदना यासाठी ड्रग्सचा वापर होत असल्याचा रिसर्चमध्ये उल्लेख होता.

कॅनबिडिओल वेगवेगळ्या पद्धतीनं शरीरात घेतलं जाऊ शकतं. धूर, वाफ किंवा एरोजल स्प्रेच्या माध्यामातून किंवा तोंडावाटे घेतलं जातं.

MDMA ड्रग सेलिब्रिटीज प्रोफाईल पार्टीजमध्ये मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. याला पार्टी ड्रग असंही म्हटलं जातं. संक्षिप्त स्वरुपात याला MD असं म्हणतात. या ड्रग्सची एक गोळी १ हजार रुपयांना मिळते. पण घेणाऱ्या व्यक्तीवरून अनेकदा किंमत ठरवली जाते. युरोपातून मुंबईत मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते.

MDMA मिथायलीनडाइऑक्सी मेथाम्फेटामाइन ला एक्सटेसी असंही म्हटलं जातं. उत्साहीत करणं, भ्रामक स्थिती निर्माण करणं, उर्जा किंवा आराम वाटण्यसाठी या ड्रगचा वापर होतो. रिपोर्टनुसार, रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानशिंदे म्हणाले की, रियाने तिच्या आयुष्यात कधीही ड्रग्स घेतले नाहीत. पुढे ते म्हणाले की, रिया चक्रवर्ती तिची रक्त तपासणी करण्यासही तयार आहे. रियाने ड्रग्जच्या संदर्भात 4 लोकांशी केलेले चॅट डिलीट केले आहेत.