रेणू शर्माचा जबाब नोंदवणाऱ्या एसीपी ज्योत्स्ना रासम आहेत कोण? त्यांच्या कामगिरीचा आढावा जाणून घ्या 

By पूनम अपराज | Published: January 14, 2021 05:53 PM2021-01-14T17:53:11+5:302021-01-14T18:25:43+5:30

Renu Sharma's Statement recorded by Acp Jyotsna Rasam : युनियन ट्रस्ट ऑफ इंडियाच्या ३२ कोटी रुपयांच्या अफरातफरीच्या गुन्ह्य़ाची उकल, मुद्रांक घोटाळ्यातील तपास, सिने अभिनेत्री रेश्मा ऊर्फ लैला खान हिच्या हत्येचा तपास, २०११ मध्ये हैदराबादहून मुंबईला आलेला १ कोटी ४५ लाख किमतीचे हिरे व सोन्याचा मुद्देमाल आरोपींसह हस्तगत करणं, दुबईच्या रोशन अन्सारीला नाटय़मय अटक करणं, इतकं नव्हे तर ‘मर्दानी’ चित्रपटासाठी राणी मुखर्जीला तालीम देणाऱ्या जिगरबाज पोलीस अधिकारी आहेत ज्योत्स्ना रासम. आता त्या धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणात देखील तक्रारदार महिलेचा जबाब नोंदवून घेण्याचं जिकरीचे काम करत आहेत. 

भ्रूणहत्येच्या विरोधात ११ दिवसांत १३ राज्यांमध्ये ६५८०  किलोमीटर प्रवास चारचाकी वाहनाने करून फास्टेस्ट वूमन म्हणून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असणाऱ्या रासम यांची कामगिरी धडाकेबाज आहे. ३० वर्षांच्या सेवेनंतर आता त्या सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. 

दुबईमध्ये आपल्या सावत्र मुलाची हत्या करून भारतात पळून आलेल्या रोशन अन्सारीचा शोध घेण्याची जबाबदारी सीबीआयकडे होती.  २००२ साली त्या ‘सीबीआय’मध्ये कार्यरत असलेल्या नीरज कुमार यांच्या नेतृत्वाखाली ज्योत्स्ना रासम यांनी काम करण्यास सुरुवात केली होती. तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला असता रोशन पूर्ण देशात हवाई मार्गाने फिरत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सातत्याने तिचा माग काढत असताना, ती मुंब्य्रात तिच्या आईकडे आल्याची खात्रीलायक माहिती सीबीआयला मिळाली. पथकाने पूर्ण तयारी करून तिथे छापा मारण्याचे ठरवले आणि आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

रासम या २७ वर्षांपूर्वी पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर दाखल झालेल्या त्या आज साहाय्यक आयुक्त म्हणून राज्य गुप्तचर विभागात र्यरत आहेत. इतक्या वर्षांच्या प्रवासात त्यांनी अनेक गुन्हयांची उकल केली. 

त्या चांगल्या गिर्यारोहक देखील आहेत. १७ हजार ते १९ हजार फूट उंचीच्या तीन शिखरांवर चढाई करण्याची ही मोहीम होती. सात जणांच्या या मोहिमेत त्या एकट्या स्त्री होत्या. १९९१ मध्ये हनुमान तिब्बा (१९४५० फूट), शितीधर (१७३४० फूट) आणि फ्रेंडशिप (१७१०० फूट) या तीन शिखरांना आमच्या चमूने यशस्वीपणे गवसणी घातली.

होत्या..‘रासम यांचे कुटुंब मूळचे राजापूरचे, पण जन्मापासून आतापर्यंतचे आयुष्य मुंबईत गेले. वांद्रे, गांधीनगर परिसरात रहाणाऱ्या ज्योत्स्ना यांचे न्यू इंग्लिश स्कूल, नंतर चेतना महाविद्यालय इथे शिक्षण झाले. घरची परिस्थिती मध्यमवर्गीय, वडील छापखान्यात कामाला होते, तर आई घर सांभाळायची; पण खाण्यापिण्यापासून शिक्षणापर्यंत आईवडिलांनी कधीही आबाळ होऊ दिली नाही, असे त्या सांगतात. 

पुढे ज्योत्स्ना रासमी सांगतात की, ‘‘वाणिज्य शाखेतून शिक्षण घेत असतानाच पदवीच्या तिसऱ्या वर्षांला असतानाच पोलीस उपनिरीक्षक पदासाठी जाहिरात आली होती. घरातून तर पाठिंबा होताच, परीक्षा दिली आणि मी उत्तीर्णही झाले. १९८९ मध्ये नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात असताना तिसऱ्या महिन्यात माझ्या एका बहिणीचा अकाली मृत्यू झाला. पूर्ण कुटुंबच हादरलं. मी घरी आले तेव्हा, अशा अवस्थेत मी काय करावं, हे समजत नव्हतं, पण आईनंच मला मार्ग दाखवला. तिनं मला धीर दिला आणि पुन्हा प्रशिक्षणाला जाण्यास सांगितले.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबईतील विमानतळ सुरक्षा विभागात त्या रुजू झालया. एक प्रकारे बंदोबस्ताचेच काम तिथे अधिक होते. डिसेंबर ९२ च्या दंगलीपासून ते मार्च ९३ मुंबई बॉम्बस्फोटापर्यंत सर्वत्र गोंधळ माजला असताना, विमानतळाची सुरक्षा राखण्याचे काम त्या विभागावर होते. स्फोटाच्या दिवसापासून तर पुढील आठवडाभर विभागातील एकही कर्मचारी घरी गेला नाही. सर्व जण दिवसरात्र बंदोबस्तात गुंतलेले होते. त्यानंतर मुंबईच्या लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात त्यांची नियुक्ती झाली.

ज्योत्स्ना रासम यांचं  राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी’ चित्रपटाचा उल्लेख होणं अतिशय गरजेचं होतं. तेव्हा ज्योत्स्ना या गुन्हे शाखेच्या कक्ष ८ मध्ये कार्यरत होत्या. त्यावेळी राणीला त्यांनी गुन्हेगारी तपासाचे धडे गिरवायला शिवकले. तर त्याचदरम्यान त्यांनी बहुचर्चित लैला खान आणि तिच्या कुटुंबीयांचा सापडलेल्या मानवी सांगाड्याप्रकरणी इगतपुरी येथे जाऊन त्यांनी तपासकार्य केले होते.