कहर! ३ व्यक्तींसोबत होते महिलेचे अनैतिक संबंध, पती विरोध करत होता म्हणून पत्नीने केली हत्या....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 03:02 PM2021-02-06T15:02:06+5:302021-02-06T15:16:00+5:30

हत्याकांडाबाबत(Murder) पोलिसांनी चौकशी केली तेव्हा धक्कादायक खुलासा झाला. हत्याकांडाची मास्टरमाइंड मृत व्यक्तीची पत्नीच निघाली.

उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात ५ दिवसांपूर्वी एका व्यक्तीच्या झालेल्या हत्येप्रकरणी पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. ५० वर्षीय व्यक्तीची हत्या त्याच्या पत्नीने प्रियकरांसोबत मिळून केली. (Image Credit : Aajtak.in)

पोलिसांनी सांगितलं की, महिलेच्या अनैतिक संबंधाचा पती विरोध करत होता. यामुळे नाराज महिलेने आपल्या प्रियकरांसोबत मिळून हत्येचा प्लॅन आखला आणि घरातच कुऱ्हाडीने पतीची हत्या केली. (Image Credit : Aajtak.in)

इतकेच नाही तर पत्नीने पतीच्या हत्येचा आरोप आपल्याच एका प्रियकरावर लावला होता. पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा पतीच्या हत्येची मास्टरमाइंड पत्नीच निघाली. (Image Credit : Aajtak.in)

पोलिसांनी हत्येच्या आरोपात मृत व्यक्तीच्या पत्नीला आणि तिच्या तीन प्रियकरांना अटक केली आहे. सोबतच त्यांना तुरूंगात पाठवलं. (Image Credit : Aajtak.in)

त्यानंतर अनैतिक संबंधासाठी महिलेने आपल्या तीन प्रियकरांसोबत हत्येचा प्लॅन केला आणि कुऱ्हाडीने कापून राम अवतारची हत्या केली. पोलिसांनी हत्याकांडाची मास्टरमाइंड महिलेसहीत तिच्या तिनही प्रियकरांना अटक केली आहे. (Image Credit : Aajtak.in)

त्यांना तुरूंगात टाकण्यात आलं आहे. अशात पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन निर्दोष व्यक्ती तुरूंगात जाण्यापासून बचावले. तर खरे गुन्हेगार तुरूंगात गेले.

यात मृत राम अवतारची पत्नी चमेलीने आपले प्रेमी ऋषि पाल यादव, गावातील मन्नू आणि सोनेलालवर हत्येचा आरोप लावला होता.

हत्याकांडाबाबत पोलिसांनी चौकशी केली तेव्हा धक्कादायक खुलासा झाला. हत्याकांडाची मास्टरमाइंड मृत व्यक्तीची पत्नीच निघाली.

पोलिसांनुसार, महिलेचे ऋषि पाल यादव, रामसेवक आणि विजयपाल या तिघांसोबतही अनैतिक संबंध होते. गेल्या एक वर्षांपासून महिला ऋषि पाल यादवसोबत राहत होती. २० दिवसांआधीच महिला आपल्या पतीच्या घरी परत आली होती.

ऋषि पाल तिला घेण्यासाठी तिच्या घरी आला होता. इथे राम अवतारचं तिच्यासोबत भांडण झालं. राम अवतारचा पत्नीच्या अनैतिक संबंधाना विरोध होता. तो तिला प्रियकराच्या घरी जाऊ देत नव्हता.