मुलांना बाहेर पाठवून प्रियकरासोबत होती पत्नी; अचानक पोहोचला पती, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 07:47 PM2020-12-28T19:47:55+5:302020-12-28T19:56:49+5:30

Crime News: मिस कॉलवरून ओळख झाली, प्रेमात रुपांतर झाले. पत्नीने पोलिसांना एक सांगितले, तर मुलांना वेगळेच सांगत राहिली.

उत्तरप्रदेशच्या अलिगढमध्ये खळबळजनक घटना समोर आली आहे. रात्री उशिरा पत्नीसोबत रंग उधळणाऱ्या तिच्या प्रियकराला पाहून पतीने ताबा गमावला. त्याने बॅटने मारून मारून पत्नीच्या प्रियकराची हत्या केली.

हिमाचल प्रदेशमध्ये काम करणारा हा पती अचानक घरी आला होता. तर मृत प्रियकर हा नोएडाचा रहिवासी आहे. पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. मृताच्या कुटुंबियांनी पोलिसांना याची सूचना दिली आहे.

हे प्रकरण बन्नादेवी ठाणेक्षेत्राच्या सारसौलचे आहे. पोलिसांनुसार आरोपी पतीचे नाव सुंदरलाल आहे. त्याला ललित आणि हरिओम नावाचे दोन मुलगे आहेत. सुंदरलाल हिमाचल प्रदेशच्या एका बिस्किट कंपनीत काम करतो. तिकडेच हे सारे राहत होते. मात्र, लॉकडाऊनमध्ये त्याने पत्नी आणि मुलांना सारसौलला पाठविले होते.

सुंदरलालने अचानक सुटी घेऊन घर गाठले. जेव्हा तो घरी पोहोचल तेव्हा त्याने पाहिले की रात्री उशिरा त्याची दोन्ही मुले घराबाहेर खेळत आहेत. घराचा दरवाजा उघडा होता.

आतमध्ये जाऊन पाहिले तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. त्याची पत्नी परपुरुषासोबत होती. हे पाहून सुंदरलालच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

महिलेच्या प्रियकराने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत सुंदरलालने दरवाजा बंद करून त्याला मारायला सुरुवात केली. संतापाच्या भरात त्याच्या हाती बॅट लागली. त्याने बॅटने मारहाण केली. यामध्ये पत्नीच्या प्रियकराचा मृत्यू झाला.

इकडे मारहाण होत असल्याचे पाहून मोठा मुलगा पोलीस ठाण्यात गेला. त्याने घरातील प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृत प्रियकराच्या खिशातील कागदपत्रे आणि मोबाईल आदी पाहून त्याची ओळख पटविली.

पोलिसांनी सांगितले की, २४ वर्षांचा विकास नोएडामध्ये राहतो. पीएसआय धिरेंद्र मोहन य़ांनी मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविला आहे. पती-पत्नीला ताब्यात घेण्यात आले आहे. पतीने पत्नीचे विकाससोबत अनैतिक संबंध होते, असे सांगितले. ते आज डोळ्यांनी पाहिले व भांडणात तरुणाचा मृत्यू झाला.

पोलिसांनी मृत प्रियकराच्या घरच्यांना कळविले आहे. ते आल्यानंतर एफआयआर दाखल केला जाणार आहे. महिलेने चौकशीत विकास मेणबत्ती व अन्य साहित्य विकण्याचे काम करतो. चार वर्षांपूर्वी त्याचा मिसकॉल आला होता. यानंतर फेसबुकवर त्याच्याशी मैत्री झाली, नंतर प्रेम जुळले. यानंतर त्यांच्या भेटी वाढल्याचे, सांगितले.

विकासच्या मृत्यूनंतर महिला रडत होती. मृतकालाच ती पती असल्याचे सांगून महिला खऱ्या पतीवर कारवाई करण्यास सांगत होती. मुलांनी सांगितले की, विकास नेहमी घरी येत होता. तो जेव्हा यायचा तेव्हा आई बाहेर खेळायला पाठवायची.

मुलांना तिने सांगितले होते की ते काका आहेत, आणि इथे भाड्याने रहायला येतात.