Gautami Patil: असाच मायेचा हात पाठिशी राहू द्या; 'खान्देश कन्या' पुरस्काराने गौतमी पाटीलचा गौरव By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 11:49 AM 2023-02-21T11:49:29+5:30 2023-02-21T12:09:05+5:30
या सर्व वादांच्या पार्श्वभूमीवर गौतमी पाटीलला आता मायभूमीतून बळ मिळालं आहे. माजी मंत्री आणि भाजप नेते जयकुमार रावल यांच्या हस्ते तिचा 'खान्देश कन्या' म्हणून गौरव करण्यात आलाय. सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असलेली नृत्यांगण गौतमी पाटीलवर अनेकदा टीका होते. गौतमीच्या डान्सवरुन तिला ट्रोल केलं जातं.
गौतमी पाटील तिच्या नृत्याच्या शैलीमुळं वादात अडकली होती. त्या वादानंतर तिनं माफी मागून असे प्रकार पुन्हा घडणार नसल्याचं देखील म्हटलं आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या बैठकीतच गौतमी पाटीलचा उल्लेख झाला होता.
गौतमीने राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल आदर व्यक्त करत, आपण लावणी कलाच सादर करणार असल्याचंही स्पष्ट केलं होतं.
या सर्व वादांच्या पार्श्वभूमीवर गौतमी पाटीलला आता मायभूमीतून बळ मिळालं आहे. माजी मंत्री आणि भाजप नेते जयकुमार रावल यांच्या हस्ते तिचा 'खान्देश कन्या' म्हणून गौरव करण्यात आलाय
गौतमी पाटीलने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये तिनं माजी मंत्री जयकुमार रावल यांचे आभार मानले आहेत.
"माजी मंत्री तथा आमदार जयकुमारभाऊ रावल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार जयकुमारभाऊ रावल यांच्या हस्ते माझा खान्देश कन्या म्हणून गौरव करून सत्कार करण्यात आला. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे.
असाच मायेचा हात सदैव माझ्या पाठी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना... जय खान्देश!" असं म्हटलं आहे. या कार्यक्रमात जयकुमार रावल यांनी गौतमीचे कौतुकही केले.
गौतमी पाटील ही महाराष्ट्रभर फेमस असून मूळ धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील आहे. म्हणूनच, येथील एका भव्य कार्यक्रमात गौतमी पाटीलचा 'खान्देश कन्या' म्हणून गौरव करण्यात आला.
दरम्यान, सोशल मीडियावरही गौतमीचा मोठा चाहतावर्ग असून तिच्या अदाकारी आणि लावणीकला पाहण्यासाठी चाहते उत्साही असतात. ती इंस्टा अकाऊंटवरुनही व्हिडिओ शेअर करते.