पक्षीप्रेमींसाठी 'भरतपूर' अभयारण्य ठरेल खास पर्वणी By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 12:30 PM 2020-02-06T12:30:04+5:30 2020-02-06T12:37:34+5:30
राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील पक्षी अभयारण्य जगप्रसिद्ध आहे. या अभयारण्याला केवलादेव राष्ट्रीय अभयारण्य या नावानेही ओळखले जाते. (सर्व छायाचित्रे - प्रशांत खरोटे)
1971 साली या अभयारण्याला संरक्षित क्षेत्र म्हणून राजस्थान वन विभागाने घोषित केले.
1985 साली या अभयारण्याला जागतिक स्तरावर ओळख मिळाली. रामसर दर्जा प्राप्त झाला. तेव्हापासून हे अभयारण्य प्रकाशझोतात आले.
आग्रा शहरापासून हे अभयारण्य 50 किलोमीटर अंतरावर आहे. विविध प्रकारच्या देशी-विदेशी स्थलांतरीत पक्ष्यांसह विविध वन्यजीवांच्या प्रजातीही येथे सहज पाहावयास मिळतात.
रंगीत करकोचा, सारस, राखी बगळा, जांभळा बगळा यांसारख्या स्थलांतरीत पक्ष्यांसह पाणथळ जागेवरील चक्रवाक, टिबुकली, थापट्या आदि बदकांचे विविध प्रकारदेखील येथे सहज पाहावयास मिळतात.
घनदाट वृक्षराजीमधून वाहणारा तलाव आणि त्यामुळे तयार झालेले पाणथळ पक्ष्यांचे हक्काचे मुक्कामाचे ठिकाण आहे.
सध्या हिवाळा सुरू असल्याने या अभयारण्यात पक्ष्यांचा जणू हिवाळी अधिवेशनच बघावयास मिळत आहे.
मागील काही दिवसांपासून येथे पक्षीनिरिक्षक व वन्यजीव छायाचित्रकारांसह पर्यटकांचीही गर्दी पाहावयास मिळत आहे.