10 most expensive jeans in the world you will be shocked to know the price
बाबो! ही आहे जगातली सर्वात महागडी जीन्स, किंमत इतकी की मुंबईत घेऊ शकता १० फ्लॅट! By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 05:17 PM2019-06-13T17:17:48+5:302019-06-13T17:22:29+5:30Join usJoin usNext आतापर्यंत तुम्ही सर्वात महागडी जीन्स किती रूपयांची घेतली असेल? ५ हजार, १० हजार किंवा २० हजार? भलेही तुम्ही महिन्याला १ लाख रूपये जरी कमावत असाल तरी सुद्धा तुम्हाला इतक्या रूपयांची जीन्स महागडीच वाटेल. पण तुम्हाला जगातल्या सर्वात महागड्या जीन्सची किंमत माहीत आहे? आज आम्ही तुम्हाला जगातल्या सर्वात महागड्या जीन्सबाबत सांगणार आहोत. यातील काही जीन्सची किंमत इतकी आहे की, तुम्ही शहरात आलिशान १० फ्लॅटही घेऊ शकाल. १०) सेवेन फॉल ऑल मॅनकाइंड - हा जीन्स पॅंटचा एक ब्रॅन्ड आहे. या ब्रॅन्डचे वेगवेगळ्या प्रकारचे जीन्स असतात. हा ब्रॅन्ड त्यांच्या परफेक्ट फिटींगसाठी ओळखला जातो. या ब्रॅन्डच्या एका जीन्सची किंमत २४८ डॉलर म्हणजेच जवळपास १५ हजार ८०० रूपये इतकी आहे. काही जीन्सची किंमत यापेक्षाही अधिक आहे. ९) अर्नेस्ट सीओन कस्टम फिट - या ब्रॅन्डच्या केवळ जीन्सच नाही तर या कंपनीकडून ग्राहकांचं व्यवस्थित माप घेऊन जीन्स तयार केली जाते. या कंपनीच्या जीन्सची किंमत १ हजार डॉलर म्हणजेच ६३ हजार रूपये इतकी आहे ८) रोबर्टो केवेली - ही जीन्स हॉलिवूड कलाकारांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. या जीन्सची खासियत म्हणजे यावर महागडे रत्न जडलेले असतात. या जीन्सची किंमत ११९९ डॉलर म्हणजेच ७६ हजार रूपये इतकी आहे. ७) डोल्चे अॅन्ड गबॅना - या जीन्सची खासियत म्हणजे याच्या मागच्या पॉकेटवर एक गुलाबी रंगाचा पॅच असतो आणि यात सोन्याचा लोगो लावलेला असतो. या ब्रॅन्डची सर्वात महागड्या जीन्सची किंमत ६४ हजार ८२५ रूपये इतकी असते. ६) गूची - या ब्रॅन्डचं नाव तर तुम्ही अनेकदा ऐकलं असेलच आणि कदाचित काही लोकांची ही जीन्स घातली सुद्धा असेल. तुम्हाला हे वाचून धक्का बसेल की, या ब्रॅन्डच्या सर्वात महागड्या जीन्सची किंमत ३१०० डॉलर म्हणजेच साधारण १ लाख ९७ हजार रूपये इतकी आहे. ५) एपो जीन्स - या ब्रॅन्डची जीन्स दिसायला तर एखाद्या सामान्य जीन्ससारखीच दिसते. पण यात लपलेला लोगो दिसत नाही. या जीन्समध्ये रेशमाच्या कापडापासून तयार केलेला खिसा असतो. आणि याचे बटन सोन्याचे किंवा अनेकदा प्लॅटिनमपासून तयार करण्यात येतात. या जीन्सची किंमत ४ हजार डॉलर म्हणजे साधारण अडीच लाख रूपये इतकी असते. ४) एस्कॅडा - या कंपनीच्या स्टोरमध्ये लोक त्यांची आवडीनुसार जीन्स तयार करून घेऊ शकतात. त्यासोबतच हा ब्रॅन्ड त्यांचेही डिझाइन करतो. या ब्रॅन्डच्या जीन्सची किंमतर १० हजार डॉलर म्हणजेच सहा लाख ३६ हजार रूपये इतकी आहे. ३) लिवाइस स्ट्रॉस अॅन्ड को. 501 - हा ब्रॅन्ड साधारणपणे सर्वांनाच माहीत आहे. हा एक लोकप्रिय ब्रॅन्ड आहे. या ब्रॅन्डचे स्वस्त जीन्सही येतात. पण या ब्रॅन्डची सर्वात महागडी जीन्स ही ६० हजार डॉलर म्हणजेच साधारण ३८ लाख रूपये किंमतीची आहे. २) डसॉल्ट एपारेल थ्रॅस्ड डेनिम - या जीन्सची खासियत ही आहे की, ही शिवण्याआधी हीला चांगला लूक देण्यासाठी १३ वेळा धुतलं जातं आणि रंग दिला जातो. या ब्रॅन्डचा जीन्स खरेदी करणे तर सोडाच पण खरेदी करण्याचा विचारही करू शकत नाहीत. कारण या जीन्सची किंमत दोन लाख ५० हजार डॉलर म्हणजे साधारण दीड कोटी रूपये इतकी आहे. १) सीक्रेट सर्कस - ही जगातली सर्वात महाग जीन्स. या जीन्सच्या मागच्या पॉकेटवर हीरे जडलेले असतात. या जीन्सची किंमत १.३ मिलियन डॉलर म्हणजेच ८ कोटी २० लाख रूपये इतकी आहे. एवढ्या किंमतीत तर मुंबई १० आलिशान फ्लॅटही मिळतील.टॅग्स :फॅशनसोशल व्हायरलfashionSocial Viral