12 year old boy from Thailand giving beauty and dressing tips
छबीदार छबी नाही, 'हा' आहे छब्या; मेक-अप टिप्स देऊन १२ वर्षीय तरुण कमावतोय लाखो रुपये By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 01:18 PM2018-11-21T13:18:23+5:302018-11-21T13:21:55+5:30Join usJoin usNext मेकअप करणं, लाली-लिपस्टिक लावणं हे केवळ मुलींचं काम असतं अशा गोष्टींना एका मुलाने चुकीचं ठरवलं आहे. एका १२ वर्षाने मुलाने असा काही कारनामा केला आहे की, त्याला पाहून मुलीही लाजतील. हा १२ वर्षांचा मुलगा जगाला ब्यूटी आणि ड्रेसिंग टिप्स देतो आहे. याने असंकाही केलं आहे की, त्याच्यासमोर चांगले चांगले स्टायलिस्ट पाणी भरायला लागतील. या मुलाने त्याच्या आवडीला त्याचा बिझनेस बनवला आहे. थायलंडला राहणारा हा नेस आपल्या आईला मेकअप करताना बघत होता. त्यामुळे त्याला बालपणापासूनच मेकअप करण्याची आवड निर्माण झाली. नेसच्या आई-वडिलांनीही त्याला कधी अडवलं नाही. उलट त्याची आवड पाहून त्याला सपोर्ट केला आणि आज तो ड्रेसिंग सेन्सपासून ते ब्यूटी टिप्स जगाला देतो आहे. या मुलाचे इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. त्याचे हे मुलींच्या वेशातील फोटो पाहून अनेकजण बुचकळ्यात पडतात. नेस इन्स्टाग्रामवर मेकअप आणि डेसिंग ट्यूटोरिअल्स देतो. महत्त्वाची बाब म्हणजे त्याची बोलण्याची स्टाइल म्हणजे एखाद्या एक्सपर्टसारखी आहे. हे सगळं करुन होणाऱ्या कमाईतून नेसने आई-वडिलांसाठी एक नवं घर खरेदी केलं आहे. नेस केवळ इन्स्टाग्रामवरच टिप्स देतो असे नाही तर अनेक प्रमोशनल डील्स, जाहिरातीही करतो. अनेक मोठ्या इव्हेंट्समध्येही त्याने सहभाग घेतला आहे. नेसच्या या कामावर काही लोक टिका करतात, पण त्याला याने काहीही फरक पडत नाही. तो त्याची आवड जोपासत आहे आणि एन्जॉय करत आहे. केवळ १२ व्या वयात या मुलाने एक नवा ट्रेंड सेट केला आहे. नेस थायलंडसोबतच बाहेर देशातील फॅन्सनाही मेकअप टिप्स देतो. टॅग्स :फॅशनसोशल व्हायरलसोशल मीडियाव्हायरल फोटोज्fashionSocial ViralSocial MediaViral Photos