स्मार्टफोन आल्यापासून प्रत्येकालाच आपण प्रोफेशनल फोटोग्राफर असल्याचे वाटते. खिशात मावणार्या आपल्या मोबाईमध्ये डिजिटल कॅमेर्याच्या तोडीस तोड फोटो निघताहेत म्हटल्यावर कोणाला फोटो काढण्याचा मोह होणार नाही. यातून सध्या नव्या आणि अपारंपरिक छायाचित्रकारांची एक पीढीच उदयाला येत आहे.फोटोग्राफीबद्दलची वाढती लोकप्रियतेला वाव देण्यासाठी अॅपलने नऊ वर्षांपूर्वी सुरु केली ‘आयफोन फोटोग्राफी अॅवॉर्डस्’ ही स्पर्धा. यामध्ये आयफोनद्वारे काढलेल्या जगभरातील फोटोंमधून सर्वोत्तम फोटोज् निवडण्यात येतात.यावर्षी चीनचा छायाचित्रकार सियुआन निऊ चा ‘ग्रँड प्राईज’चा मानकरी ठरला. त्याने आयफोन ५एस मोबाईलने काढलेला ‘मॅन अँड द ईगल’ या फोटोची सर्वोत्तम छायाचित्र म्हणून निवड करण्यात आली. टियान्शान माउंटेन भागतील एकसत्तर वर्षीय माणूस आणि त्याचे पाळीव गरुड एक मेकांच्या चेहर्यासमोर उभे असलेला हा फोटो आहे.पोलंड आणि अमेरिकेतील स्पर्धकांच्या फोटोंची पहिल्या, दुसर्या आणि तिसर्या क्रमांकासाठी निवड झाली. स्पर्धेत विजेते ठरलेले आणि काही आमचे आवडते फोटो येते दाखवत आहोत.Siyuan Niu - Grand Prize WinnerRobin Robertis - 2nd Place WinnerCarolyn Mara Borlenghi - 3rd Place WinnerErica Wu - 'Animals'Jian Wang - 'Architecture'