bollywood fashion trends from 2019 girls love to follow in fashion 2020
2020 मध्ये दिसा स्टायलिश; 'हे' फॅशन ट्रेंड्स नक्की करा ट्राय By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 02:26 PM2020-01-06T14:26:59+5:302020-01-06T14:31:27+5:30Join usJoin usNext सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचं दमदार स्वागत करण्यात आलं आहे. या नवीन वर्षात आणखी सुंदर आणि स्टायलिश दिसायला सर्वांनाच आवडेल. सातत्याने नवनवीन ' फॅशन ट्रेंड्स हे येत असतात. 2020 मध्ये 'हे' फॅशन ट्रेंड्स नक्की करा ट्रायमोनोक्रोम ड्रेस नववर्षात मोनोक्रोम ड्रेस ट्राय करून कूल लूक करा. या वर्षभरात हा ट्रेंड कायम राहणार आहे. सेम टोनच्या टोन्सच्या संपूर्ण आऊटफिटचा रंग एक असून वेगवेगळ्या टोन्समध्ये आहेत.पोल्का डॉट्स पोल्का डॉट्सची फॅशन ही खरं तर जुनी आहे. मात्र सध्या पुन्हा एकदा नव्याने अनेकांनी या लूकला पसंती दर्शवली आहे. 2020 मध्ये ही पोल्का डॉट्स ड्रेस सुपर स्टायलिश लूक देणार आहे. यूटिलिटी जंपसूट्स जंपसूट्सच्या ओरिजनल व्हर्जनमध्ये एक वनपीस ड्रेस असतो. बॉलिवूडच्या यूटिलिटी जंपसूट्समध्ये पॉकेट्स असतात. यूटिलिटी जंपसूट्सची सध्या क्रेझ पाहायला मिळत आहे. यामुळे हटके लूक मिळतो. स्ट्राइप्स स्कर्ट, टी-शर्ट पासून ते फॉर्मल सूटवर देखील स्ट्राइप्सची जादू पाहायला मिळते. स्टाइप्समुळे ग्लॅमरस दिसता येतं. ओवर साइज्ड डेनिम 2019 प्रमाणे याही वर्षी हाय वेस्ट, लूज, लाँग स्लीव्स आणि फ्लेयर्ड डेनिम लूक रॉक करणार आहे. ओवर साइज्ड डेनिम ही कूल लूक देत असल्याने त्याचा सध्या ट्रेंड आहे. टॅग्स :फॅशनfashion