-मोहिनी घारपुरे-देशमुखकितीही गबाळा लूक कॅरी करत असलात तरीही एखादा स्मार्ट श्रग घातला की तुमचा लुक एकदम अपडेट होऊ शकतो.एखाद्या दिवशी वॉर्डरोबमधलं नेमकं काय घालावं हेच लक्षात येत नाही. कितीही चांगले कपडे जवळ असले तरीही कधी ते नीट धुतलेले नसतात किंवा त्यांना व्यवस्थित इस्त्री केलेली नसते. मग अशावेळी नेमकी तारांबळ उडते. अगदी अशाच वेळी मदतीला धावतो तो श्रग. हा श्रग घातला की कपडे आपोआपच काहीप्रमाणात झाकले जातात आणि त्यावरची नजर हटून सगळं लक्ष श्रगवरच केंद्रीत होतं. असा हा श्रग उन्हाळ्यात फारवेळ जरी घालवत नसला तरीही जॅकेटप्रमाणे थोडावेळ नक्कीच तारून नेऊ शकतो.श्रग दोन प्रकारचे असतात. एक लांब, गुडघ्याच्यावरपर्यंत तर दुसरे शॉर्ट, म्हणजे वेस्टलाईनपर्यंत. अत्यंत आकर्षक असे हे श्रग सोनेरी, चंदेरी, काळ्या रंगात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर अन्य रंगातही ते वेगवेगळ्या स्टाईलमध्ये उपलब्ध आहेत.कधी लोकरीचे, कधी रफल्स असलेले, कधी पाठीमागे संपूर्णत: क्रोशावर्क, नीटेड असलेले अनेक प्रकार या श्रगमध्ये सापडतील. विशेषत: स्लीव्हलेस ड्रेस घातल्यानंतर बाहेर जाताना त्यावरून एखादा स्मार्टसा श्रग घातला तर फारच सुंदर, आकर्षक लुक येतो.हे श्रग एखाद्या ओव्हरकोटप्रमाणेच असतात पण त्यांना समोरच्या बाजूला बटन्स नसतात. त्यामुळेच ते घालणं अत्यंत सोपं आणि सहज असतं. अलिकडे अनेक मुली आपल्या वॉर्डरोबमध्ये या श्रगला विशेष पसंती देऊ लागल्या आहेत.एखाद्या कार्यक्रमाला किंवा पार्टीला जाताना गोल्डन, सिल्व्हर आणि ब्लॅक कलरच्या श्रगलाच अधिक प्राधान्य दिलं जातं. त्यावर मोठ्या माळा, मोठ्या इअररिंग्स आणि स्टेलेटोज घातले तर एकूणच एक स्मार्ट लुक येतो.