dolly jain a saree draper for ambanis and other bollywood celebrities
साडी नेसवण्याची कला भारी; महिला करते लाखोंची कमाई By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 02:56 PM2019-03-27T14:56:33+5:302019-03-27T15:01:46+5:30Join usJoin usNext साडी नेसवून लाखोंची कमाई, असं जर तुम्हाला कदाचित कोणी सांगितलं, तर तुमचा कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र डॉली जैन बड्याबड्या सेलिब्रिटींना साडी नेसवून लाखोंची कमाई करतात. त्यांनी ईशा अंबानी, दीपिका पादुकोण, प्रियंका चोप्रा, सोनम कपूर यांच्या लग्नात त्यांना साडी नेसवली आहे. डॉली जैन आधी फक्त जीन्स, टीशर्ट, स्कर्ट्स परिधान करायच्या. मात्र लग्न करुन सासरी गेल्यावर त्यांना साडीच नेसावी लागायची. त्यामुळे त्यांना साडी नेसायची सवय लागली. डॉली यांनी विविध प्रकारे साडी नेसण्यास सुरुवात केली. रात्री घरातील सर्वजण झोपल्यावर त्या याची प्रॅक्टिस करायच्या. आधी त्यांनी एकच साडी 80 विविध प्रकारे नेसण्याचा विक्रम केला. त्यासाठी त्यांच्या नावाचा समावेश लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आला. इतरांना साडी नेसवता यावी यासाठी त्यांनी घरात एक पुतळा आणला. त्या पुतळ्याला साडी नेसवण्याची प्रॅक्टिस करत त्यांनी आणखी एक विक्रम केला. एकच साडी तब्बल 325 प्रकारे नेसवून त्यांनी स्वत:चाच विक्रम मोडला. मुंबईत त्यांनी सर्वप्रथम श्रीदेवी यांना साडी नेसवण्याची संधी मिळाली. श्रीदेवींना डॉली यांच्यातील कला अतिशय आवडली. तुमच्या हातात जादू आहे, असं श्रीदेवी कौतुकानं डॉली यांना म्हणाल्या. श्रीदेवी यांच्यानंतर डॉली यांनी अनेक प्रसिद्ध अभिनेत्री, सेलिब्रिटीजना साडी नेसवली. अनेक कार्यक्रमांसाठी त्यांना आमंत्रणं येऊ लागली.टॅग्स :फॅशनfashion