-Ravindra Moreघर आतून सुंदर दिसावे म्हणून आपण खूप प्रयत्न करतो, मात्र घराचे अंगणही सुंदर दिसणे गरजेचे आहे, कारण अंगण कसे आहे यावरून घराची संस्कृती ठरत असते. बहुतांश घर आतून सजविण्याच्या प्रयत्नान आपले अंगणाकडे दुर्लक्ष होते. असे न करता घराच्या अंगणाची कशी सजावट करावी याबाबत जाणून घेऊया. आकर्षक दिव्यांची रोषनाईअंगण म्हटले म्हणजे त्याठिकाणी फुलझाडे आलेच. ते फुलझाडे अधिक आकर्षक दिसण्यासाठी त्यांच्यावर आकर्षक दिव्यांची रोषनाई करू शकता. यामुळे ती जागा संध्याकाळच्या वेळी भकास वाटणार नाही. तसेच आकर्षक डिझाइन्सचे गेट लावल्यास अंगण अधिक सुंदर दिसेल.कृत्रिम तळेमनाला शांती वाटण्यासाठी घराच्या अंगणात एखाद्या लहान कृत्रिम तळ्याची निर्मिती करु शकता. यामुळे अंगणाला नैसर्गिक सौंदर्यदेखील प्राप्त होईल. बैठक व्यवस्थानिवांत क्षण घालविण्यासाठी घराचे अंगण म्हणजे हक्काची जागा असते. म्हणून याठिकाणी विसावण्यासाठी आकर्षक फर्निचराने बैठक व्यवस्था करु शकता. संध्याकाळी किंवा सुटीच्या दिवशी सर्वजण एकत्र बसून गप्पा गोष्टींमध्ये वेळ घालवू शकता. आकर्षक बगीचा गीचा अधिक सुंदर बनविण्यासाठी नेहमीच्या फुलझाडांबरोबरच काही आकर्षक फुलझाडेही लावावीत. कुंडयांवर आकर्षक पेटींग्ज करावे.खास हिवाळयासाठी शेकोटीप्रेमाच्या माणसांबरोबर काही हळवे क्षण घालविण्यासाठी खास हिवाळयाच्या दृष्टीने बगिच्यात शेकोटीची सोय असावी.अशा प्रकारे बगिच्याचे सौंदर्य खुलविण्यासाठी वरील टिप्सचा उपयोग करता येईल.