isha ambani before wedding function pooja sabyasachi wedding dress
अंबानींच्या राजकुमारीचा नववधू साज; दीपिका-अनुष्कापेक्षाही आहे खास! By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 12:55 PM2018-11-30T12:55:29+5:302018-11-30T13:00:30+5:30Join usJoin usNext मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीच्या वेडिंग फंक्शन्सला सुरुवात झाली आहे. ईशा अंबानी आपला मित्र आनंद पिरामल यांच्यासोबत 12 डिसेंबर रोजी आपली लग्नगाठ बांधणार आहे. लग्नाआधी ईशा अंबानीसाठी गृह शांतीची पूजा करण्यात आली होती. यादरम्यानच्या ईशाच्या लूकचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ईशा अंबानीने पुजेसाठी केलेला हा खास लूक प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाचीने डिझाइन केला होता. ज्यामध्ये ईशा फार सुंदर दिसत आहे. सब्यासाचीने इंस्टाग्रामवर ईशा अंबानीचे काही फोटो शेअर केले आहेत. ईशा अंबानीचा हा लूक आणि तिच्या या फोटोंची चर्चा सध्या इंटरनेटवर होत आहे. सर्वांना ईशाचा हा लूक फार आवडला असून ईशाही या लूकमध्ये एखाद्या राजकुमारीप्रमाणे दिसत आहे. टॅग्स :ईशा अंबानीमुकेश अंबानीईशा अंबानी आणि आनंद पिरामलसब्यसाचीफॅशनब्यूटी टिप्सIsha AmbaniMukesh AmbaniIsha Ambani WeddingSabyasachifashionBeauty Tips