सारा आणि जान्हवीचा रेड हॉट लूक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 19:43 IST2019-01-01T19:36:54+5:302019-01-01T19:43:20+5:30

2018मध्ये अनेक स्टार किड्सनी बॉलिवूडमध्ये आपला डेब्यू केला. परंतु सर्वात जास्त चर्चेमध्ये जे दोन चेहरे होते ते म्हणजे जाह्नवी कपूर आणि सारा अली खान. आपल्या डेब्यूसोबतच त्या चाहत्यांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्या.
या दोघींच्या अभिनयासोबतच त्यांच्या फॅशन सेन्सचीही चर्चा असते. काही दिवसांपूर्वी सारा आणि जान्हवी दोघीही रेड कलरच्या शिमरी ड्रेसमध्ये दिसून आल्या. पाहूयात त्यांचे घायाळ करणारे फोटो.
आपल्या लेटेस्ट फोटोशूटदरम्यान जान्हवी कपूर रेड कलरच्या शिमरी साइड कट असणाऱ्या ड्रेसमध्ये दिसून आली.
ड्रेससोबतच जान्हवीचा किलर अॅटिट्यूडही या फोटोमध्ये दिसत आहे. ज्यामुळे हे फोटो आणखी हॉट आणि सेक्सी दिसत आहेत.
सारा अली खान आपला दुसरा चित्रपट सिम्बाच्या प्रमोशनदरम्यान वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये फार सुंदर दिसत होती.
सारा ने Topshop x Halpern vs ने डिझाइन केलेला डीप रेड कलरचा शॉर्ट ड्रेस वेअर केला होता. ज्यामध्ये ती फार सुंदर दिसत होती.