lifestyle actress sonam kapoor biker saree look viral on internet amazing look for festival
इंटरनेटवर सोनम कपूरच्या बायकर साडी लूकची चर्चा; तुम्हीही करू शकता ट्राय By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 02:19 PM2019-09-16T14:19:58+5:302019-09-16T14:30:00+5:30Join usJoin usNext इंटरनेटवर सध्या अभिनेत्री सोनम कपूरच्या बायकर साडीतील लूकचीच चर्चा रंगली आहे. या लूकमध्ये सोनम खूपच सुंदर दिसत आहे. सण-समारंभांना सोनमसारखाच अनारकली आणि बायकर साडी लूक तुम्हीही ट्राय करू शकता. सोनम कपूरने लाल रंगाचा फ्लोर लेंथ अनारकली ड्रेस परिधान केला आहे. या अनारकलीवर सोनेरी रंगाची एम्ब्रॉयडरी केलेली आहे. यावर करण्यात आलेली ट्री ट्रंक ग्रिड याची खासियत असून ड्रेसची चमक आणखी वाढली आहे. सोनम कपूरने अनारकलीला साजेसा सुंदर मेकअप देखील केला आहे. तसेच सोनेरी झुमके आणि लाल रंगाची टिकली लावली आहे. सोनमच्या बायकर साडीतील लूकची खूपच जास्त चर्चा होत आहे. तुम्हीही सोनमसारखा हटके आणि क्लासी लूक करून सुंदर दिसू शकता. बायकर साडीवर सोनमने मोठ्या कॉलरचा ब्लाउज आणि डँगलर्स परिधान केले आहेत. सोशल मीडियावर या लूकला अनेकांनी पसंती दर्शविली आहे. टॅग्स :सोनम कपूरफॅशनSonam Kapoorfashion