lifestyle wear these traditional red dresses to look super stylish in this festive season
फेस्टिव्ह सीझनमध्ये सुंदर दिसण्यासाठी सेलिब्रिटींकडून घ्या टिप्स; ट्राय करा रेड ट्रेडिशनल लूक्स By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 03:39 PM2019-09-25T15:39:17+5:302019-09-25T15:46:52+5:30Join usJoin usNext नवरात्र, दसरा, दिवाळी सणांच्या खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. तरुणाईने ही खरेदीसाठी गर्दी केली आहे. सण समारंभात ट्रेडिशनल आणि हटके क्लासिक लूक करण्याकडे सर्वांचा कल असतो. लाल रंग हा नेहमीच सुंदर दिसतो. या रंगाच्या कपड्यांमध्ये सौंदर्य अधिक खुलून येतं. सध्या लाल रंगाचाच ट्रेंड सुरू असलेला पाहायला मिळत आहे. बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देखील या रंगाने भूरळ पाडली आहे. सोनम कपूर सोनम कपूरने आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी यावेळी रेड थीम निवडली होती. सोनमने सुंदर ट्रेडिशनल लूक केला होता जो फेस्टिव्ह सीझनसाठी अत्यंत परफेक्ट आहे. आलिया काही दिवसांपूर्वी आलियाने लाल रंगाची साडी परिधान केली होती. ज्यावर थ्रेड वर्क करण्यात आलं होतं. यासोबतच तिने सोनेरी रंगाचे झुमके घालणं पसंत केलं. आलियाप्रमाणे तुम्हीही असा लूक नक्की ट्राय करा. दीपिका पादुकोण दीपिका पादुकोणकडे ट्रेडिशनल ड्रेसेसचं सुंदर कलेक्शन आहे. तिचा प्रत्येक लूक एकदम भारी असतो. त्यामुळे फेस्टिव्ह सीझनसाठी दीपिकाची फॅशन फॉलो करायला काही हरकत नाही. सारा अली खान सारा अली खान सध्या तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिने एका रेड लेहंग्यामध्ये फोटोशूट केलं होतं. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. शिल्पा शेट्टी faux leather साडी परिधान करून शिल्पा शेट्टीसारखा हटके लूक नक्की करता येईल. सण-समारंभांना अभिनेत्रींप्रमाणे तुम्हीही असा लूक ट्राय करून सुंदर दिसा.टॅग्स :फॅशनfashion