इंग्लंडमध्ये सध्या मस्त उन्हाळा आहे. जगभरातील पर्यटक सध्या लंडनमध्ये गर्दी करू लागले आहेत. यामध्ये आखाती देशातील गर्भश्रीमंत आणि राजघराण्यातील लोकांचादेखील सामावेश आहे. साऊदी अरेबिया, कुवैत येथून आलेले हे श्रीमंत पर्यटक एकटेच नाही आले तर सोबत सुपर लक्झरी कार्सचा ताफासुद्धा घेऊन आले आहेत. त्यामुळे सध्या लंडनच्या रस्त्यांवर लॅम्बोर्गिनी, फेरारी, पोर्शे, रोल्स रॉईस सारख्या कार्स हमखास पार्क केलेल्या आढळतील.Mercedes-Benz G63 AMG 6x6दरवर्षी उन्हाळ्यामध्ये लंडनमध्ये असा ‘सुपरकार’ मेळावा भरतो. सुट्या एंजॉय करण्यासाठी आलेल्या अतिश्रीमंत लोकांच्या लक्झरी कार्स तर आता आकर्षण ठरत आहेत. यातील बहुतांश कारर्सचे मालक अरब देशांतील व्यावसायिक आणि राजघराण्यातील लोक असतात. ते कतार, कुवैत, युएई येथून या कार विमानाद्वारे सुमारे पाच हजार किमी दूर थेट लंडनमध्ये पार्सल करतात. त्यासाठी येणारा १७ लाख रुपयांचा साधारण खर्च त्यांच्यासाठी काही विशेष नाही.Lamborghini Aventador लंडनमधील पॉश भागातील रस्त्यांवर डिझायनर दुकाने व हॉटेल्सच्या बाहेर एका मागे एक अशा ड्रीम कार्स पार्क केलेल्या पाहून कोणाला सुपरकार्स प्रदर्शन भरले की काय असा भास होईल. यामध्ये मर्सिडिज-बेन्झ एसएलआर मॅक्लेरेन ७२२, फेरारी ४८८, लॅम्बोर्गिनी अॅव्हेंटेडोर, रोल्स रॉईस, पोर्शे जीटी ३ अशा एकाहून एक महागड्या सुपरकार्स पाहायला मिळतात.Lamborghini Aventador