- अनन्या भारद्वाजमाधुरी दीक्षितचा आज 50 वा वाढदिवस. माधुरी नावाची अनेकांच्या दिल की सुंदर धडकन आज पन्नाशीची झाली यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. ती आजही तितकीच सुंदर दिसते. तिचं एक स्माईल, तिची एक झलक तिच्या करिअरच्या सुवर्णकाळाची याद करवून देते. तिची ती ‘मोहिनी’ आजही कायम आहे. मात्र माधुरीच्या करिअरकडे, तिच्या वाटचालीकडे पाहून काही गोष्टी नक्की प्रोफेशनल स्किल्स म्हणून शिकायला हव्यात. प्रत्यक्षातली म्हणजेच पर्सनल आयुष्यात माधुरी जगण्याचा कसा विचार करते हे माहिती नसलं तरी तिच्या बॉलिवूडच्या करिअरकडे पाहून काही गोष्टीं सॉफ्ट स्किलसह प्रोफेशनल स्किल्स म्हणून पहायला हव्यात. माधुरीची लाईफस्टाईलही त्या गोष्टी ठळकपणे दाखवते. आजच्या कार्पोरेट करिअरच्या जगात आणि आपलं काम हाच आपला ब्रॅण्ड असं अधोरेखीत करण्याच्या जगात या गोष्टींवर एक नजर घालायला हवी..१) स्माईल प्लीजमाधुरीचं स्माईल ही एक जादू आहे. तसं जादुई स्माईल काही आपल्या साऱ्यांनाच वरदान म्हणून लाभलेलं नाही. मात्र तरीही कामाच्या ठिकाणापासून ते व्यक्तिगत आयुष्यात नातेसंबंध जपण्यापर्यंत हसावं, स्माईल करावं तर ते माधुरीसारखं. मनापासून. मोठ्ठं. थेट. उगीच हसल्यासारख्या करायचं, केलं म्हणून केलं स्माईल, काय करणार एक स्माईल तर द्यायलाच हवं असं उपकार केल्यागत काही लोक हसतात. त्यामुळे आपल्याला वाटत नसलं तरी इतरांना ते आपलं खोटंखोटं हसू कळतंच. आणि त्याचा व्हायचा तो वाईट परिणाम होतोच. म्हणून स्माईल करायचं तर ते सच्चं वाटलं पाहिजे, मनापासून केल्यासारखं हवं. माधुरीसारखं. तिचं स्माईल ही तिची ताकद असेल तर ती ताकद आपली का असू नये? प्रत्येक हसरा चेहरा सुंदरच दिसतो.(धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा 50वा वाढदिवस)२)प्रॅक्टिस द बेस्ट!माधुरी कथक उत्तम करते. अजूनही शिकतेय. रोज सकाळी अजूनही न चुकता रियाज करते हे सारं आपण वृत्तपत्रात वाचत असतोच. पण त्यापलिकडे त्यात एक गोष्ट दिसते. ती म्हणजे सराव. आपल्याला जे येतं, त्याचा वारंवार सराव. त्याच नृत्यशैलीच्या जोरावर तिनं एक काळ गाजवला. मात्र येतं मला सारं असा अॅटिट्यूड कधी तिच्या चेहऱ्यावर दिसला नाही. आपलं स्किल अधिकाधिक उत्तम आणि बिनचूक कसं करता येईल याचं हे एक उदाहरण.३) आपलं नाव, आपला ब्रॅण्डज्या टप्प्यावर अनेक मराठी माणसं कमी पडतात तो टप्पा माधुरी ओलांडू शकली, तो म्हणजे तिचं काम, तिचं नाव, हाच तिचा ब्रॅण्ड झाला. तिचे सिनेमे चालो ना चालो, पण तिचा ब्रॅण्ड कायम चालला. त्याची विश्वासार्हता कायम राहिली. ब्रॅण्डचं गुडवील कायम राहिलं. काळ बदलला तरी माधुरी दीक्षित नावाच्या ब्रॅण्डचं कौतूक कायम राहिलं. आपलं काम असा आपला ब्रॅण्ड बनला पाहिजे. आपलं नाव हाच आपला ब्रॅण्ड, तीच आपली ओळख. मग काळ बदला नाही तर कंपनी बदला.४) नो नॉनसेन्स!तिच्या करिअरच्या काळात तिच्यावर टीका झाली. तिचे करिअरचे निर्णय चुकले. सिनेमे पडले. काय वाट्टेल त्या भूमिका करते म्हणून आरोप झाले. मात्र ती गप्प झाली. ज्याला त्याला उत्तरं देत बसली नाही, तिनं बडबड केली नाही. ती शांतपणे आपलं काम करत राहिली. आजच्या सोशल मीडीयाच्या काळात तर हे आपल्यालाही जमायला हवं. बोलेल ते आपलं काम. उगीच बडबड करत, याच्यात्याच्यावर टीका करत, लोकांच्या भांडणात पडत, आपल्या संदर्भात खुलासे देत बसायचे नाहीत. जे करायचं ते करायचं. शांतपणे. म्हणायचं इथं नॉनसेन्स खपवून घेतला जात नाही. ५) कमबॅक स्ट्रगल तुम्ही कितीही मोठे स्टार असा, मोठा ब्रॅण्ड असा, तुमचा भूतकाळ कितीही मोठा असो, तुम्हाला वर्तमानात पुन्हा पुन्हा स्वत:ला सिद्ध करावं लागतंच. माधुरीनं कमबॅक केलं तोवर काळ पुढं सरकला होता. टेक्निकल गोष्टीच नाही तर बॉलिवूड सर्वार्थानं पुढं सरकलं होतं. सिनेमाची निवड चुकली तिची. कमबॅक यशस्वी झालं नाही. पण म्हणून ती हरली नाही, ती कमबॅकचे प्रयत्न वेगवेगळ्या टप्प्यातून करतेच आहे. टीव्ही शो, जाहिराती यातून तिचं अस्तित्व तिनं टिकवून धरलं आहे. कमबॅकचा स्ट्रगल कुणालाही चुकत नाही, तो करण्यात चूकही काही नाही, याचं अजून मोठं कुठलं उदाहरण हवं?