लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडिज-बेंझने पहिलीवहिली गोल्फ कार्ट तयार केली आहे. मर्सिडिज-बेंझ स्टाईल एडिशन गेरिआ गोल्फ कार असे तिचे नाव आहे. आता मर्सिडिजची कार म्हटल्यावर विचार मनात येईल की मग यामध्ये फीचर्स काय दिलेले असतील? आपले ‘लक्झरी’ स्टेटस कायम ठेवत कंपनीने या कारमध्ये फ्रीज, इंटेगे्रटेड टचपॅड, ब्लूटूथ स्टेरिओ आशा सुविधा दिल्या आहेत. या गोल्फ कार्टची टॉप स्पीड ३० किमी प्रतितास एवढी आहे. विशेष म्हणजे कंपनी या कारला खरीखुरी ‘स्पोर्टस् कार’ म्हणून ब्रँडिंग करत आहे. आहो खरंच! त्यासाठी रिअल स्पोर्टस् कार नावाने प्रोमोशनल वेबसाईटदेखील लाँच केली आहे. सध्या तरी केवळ प्रोटोटाईप तयार आहे. पण लवकरच जगभरातील गोल्फ कोर्सेसवर ही कार धावताना दिसेल. मर्सिडिज-बेंझचे डिझायनर, डायमलर्स् थिंक अँड अॅक्ट टँक बिझनेस इनोव्हेशन्स आणि गोल्फ कार्टचे निर्माण करणारी कंपनी गेरिआ यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ही कार तयार करण्यात येत आहे. कार्टचे स्पेसिफिकेशन पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा.कार्टमध्ये एलईडी हेडलॅम्पचा वापर करण्यात आला आहे.मागच्या बाजूस गोल्फ बॅग ठेवण्यासाठी जागा राहणार.डॅशबोर्डमध्ये इंटेग्रेटेड टचपॅड असणार ज्यामध्ये गोल्फ कोर्सची संपूर्ण लेआऊट, सद्याचे लोकेशन, ईलेक्ट्रॉनिक स्कोअर कार्ड आणि इतर फंक्शन्स असणार.बेंच सीट खाली फ्रीज असेलकारची किंमत अद्याप घोषित केलेली नाही.