Cooool.... उन्हाळ्यातील लग्नसमारंभात 'या' 5 हेअरस्टाइल करा, चिंता विसरा! By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 02:36 PM 2018-03-26T14:36:45+5:30 2018-03-26T14:36:45+5:30
एप्रिल - लग्न समारंभ म्हणजे आनंदाचा क्षण असतो. मात्र उन्हाळ्यात लग्न आणि तेही दिवसा. कल्पनादेखील नकाशीच वाटते. अशा समारंभामध्ये सुंदर दिसावं म्हणून आपण आपल्या सौंदर्याची योग्य ती काळजी घेतो. लग्नसमारंभात मुख्यतः मेकअप-हेअरस्टाइलला प्राधान्य दिलं जातं. आर्टिफिशियल किंवा ख-या फुलांचा जास्तीत जास्त वापर करून विविध केशरचना केल्या जातात. मुख्य समारंभाच्या वेळी केशरचना करताना काही काळजी मात्र जरूर घ्यावी. उन्हाळ्यातील लग्नसमारंभात खालील 5 हेअरस्टाइल नक्की करुन पाहा.
1. वेणीची हेअरस्टाइल काही स्त्रियांचे केस घनदाट आणि लांब असतात. लग्नात दिवसभर केस व्यवस्थित राहावेत, यासाठी केसांची वेणी घालून केलेली हेअरस्टाइल नेहमीच चांगली दिसते.
2. पारंपरिक अंबाडा आजकाल अंबाडामध्येही खूप प्रकारच्या स्टाइल करता येतात. उन्हाळ्यात वातावरणात उष्णता जास्त असल्याने केसांचा उंचावर अंबाडा घातल्यास तुम्हालाही सुटसुटीत वाटू शकतं.
3. साईड पार्टेड केस एका बाजूस घेऊन नावीन्यपूर्ण हेअरस्टाईल करता येते. केस कुरळे करून किंवा एका बाजूस वेणी घालून कोणत्याही ड्रेसवर तुम्हाला ही हेअरस्टाइल करता येऊ शकते.
4. केस कुरळे करणे उन्हाळ्यात केसांवर स्प्रे वापरल्यास केस खराब होतात. यावेळी केस कुरळे करणे चांगला पर्याय ठरू शकतो.
5. पोनीटेल पोनीटेल्स ही प्रत्येक मुलीची आवडती हेअरस्टाईल. या स्टाइलमध्ये काही केसांचा वापर पोनीटेलसाठी रबर बँडप्रमाणे बांधण्यासाठी केला जातो.