ऑनलाइन लोकमतजुन्नर, दि 1 - जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागात दरवर्षी पावसाळ्यात विविध रानभाज्या आढळून येतात. या भाज्या चवीला रुचकर असतातच शिवाय आरोग्यासाठी त्या पौष्टीक आणि औषधीसुद्धा असतात. जाणून घेऊया काही रानभाज्यांचे महत्त्व टाकळा - ही भाजी साधारणतः पावसाळ्यात अधिक उपलब्ध असते. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत तिला फुले येतात- टाकळाला सुगंध उग्र असला तरी कोवळ्या पानांची भाजी रुचकर लागते - ही भाजी सर्व प्रकारच्या त्वचा रोगावर उत्तम औषध आहे, टाकळ्याच्या बिया वाटून त्याचा लेप त्वचेवरही लावला जातो.- तसंच ही भाजी उष्ण असल्याने शरीरातील वात व कफ कमी होण्यास मदत होते आंबुशी - आंबुशी राज्यात सर्व आढळते - आंबुशी गुणाने रूक्ष व उष्ण आहे. ही वनस्पती पचनास हलकी असून भूक वाढीसाठी उपयुक्त आहे - तसेच कफ, वात आणि मूळव्याध यात आंबुशी गुणकारी आहे मायाळू - मायाळू ही बहुवर्षायू वेल असून या वनस्पतीची बागेत, अंगणात, परसात तसेच कुंडीत लागवड करतात- मायाळूचे वेल कोकणात सर्वाधिक प्रमाणात आढळतात - मायाळूची कोवळी पाने भाजीसाठी वापरतात - रक्ताची किंवा पित्ताची उष्णता अतिशय वाढल्यास मायाळूची भाजी गुणकारी आहे - गुणधर्माने ही भाजी थंड स्वरूपाची आहे- मायाळूची भाजी पालकाप्रमाणे पचण्यास हलकी आहे. करटोली - करटोलीची वेल कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम घाट व पश्चिम महाराष्ट्र परिसरात आढळतात- करटोलीला जून ते ऑगस्ट महिन्यात फुले व त्यानंतर फळे तयार होतात- करटोलीच्या फळांची भाजी कारल्यासारखीच असून पावसाळ्याच्या अखेरीस ही भाजी बाजारात उपलब्ध होते- करटोली हे डोकेदुखीवरील उत्तम औषध आहे. तसेच मधुमेहाच्या रुग्णांनी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते कपाळफोडी - कपाळफोडी या वनस्पतीची वेल राज्यात वनात, शेत आणि ग्रामीण भागात आढळते- सांधांना सुज आल्यास पाण्यात किंवा दुधात ही वनस्पती वाटून त्याचा लेप करावा व तो लाववा. यामुळे वेदना कमी होतात व सूजदेखील उतरते.- कानाच्या दुखण्यावरही ही वनस्पती गुणकारी आहे शेवळा - शेवळा ही वर्षायू, कंदवर्गीय वनस्पती आहे- महाराष्ट्रामध्ये शेवळा वनस्पती कोकण, पश्चिम महाराष्ट्र व अकोला येथील जंगलात आढळते- शेवळ्याचा कंद औषधात वापरतात- शेवळ्याचे कंद व कोवळी पाने भाजीसाठी वापरतात. मोरशेंड - ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती पावसाळ्यात सर्वत्र आढळते- मोरशेंड वनस्पतीच्या कोवळ्या पानांची भाजी करतात- या भाजीच्या सेवनामुळे रक्तातील अॅसिडचे प्रमाण कमी होऊन सांध्यांची सूज कमी होते नळीची भाजी - नळीची भाजी ही वनस्पती तळी व तलावांच्या शेजारी, काठांवर, पाणथळ, ओलसर जमिनीवर, दलदलीच्या ठिकाणी वाढलेली आढळते.- नागिणीच्या उपचारात ही वनस्पती वापरली जाते. तसेच कावीळ, श्वासनलिका दाह व यकृत विकारासाठी या वनस्पतीचा वापर करतात आघाडा - आघाडा ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती असून, पावसाळ्यात जंगलात, ओसाड, पडीक जमिनीवर, रस्त्यांच्या कडेने, शेतात सर्वत्र आढळते.- प्रामुख्याने उष्ण कटिबंधीय प्रदेशात ही वनस्पती आढळते - या वनस्पतीची मुळे, पाने, फुले, फळे (पंचांग) औषधात वापरतात- अंगातील जास्त चरबी कमी होण्यासाठी आघाड्याच्या बिया उपयुक्त आहेत- जेवण्यापूर्वी आघाड्याचा काढा दिल्यास पाचक रस वाढतो तर जेवणानंतर दिल्यास आम्लता कमी होते.- रातांधळेपणात आघाड्याच्या मुळाचे चूर्ण देतात. भुईआवळी - भुईआवळी ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती असून 20 ते 50 सें.मी.पर्यंत उंच वाढते. - भुईआवळी ही वनस्पती एरंडाच्या कुळातील आहे - याची पाने, कोवळी खोडे व फांद्या भाजी करण्यासाठी वापरतात- थंडीताप, सर्दी-खोकला या आजारांवर ही भाजी गुणकारी आहे